पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योग दिन काश्मिरात

श्रीनगर, वृत्तसंस्था : काश्मीरसाठी योग एक आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. पावसाने आव्हान उभे केल्यानंतरही काश्मीरच्या अनेक लेकींचा योगाबद्दलचा उत्साह मावळला नाही. योगावर त्या ठाम राहिल्या. काश्मीरचे हे दृश्य संपूर्ण देशाला आश्वस्त करणारे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस काश्मिरातील श्रीनगरात साजरा केला. दल …

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योग दिन काश्मिरात

श्रीनगर, वृत्तसंस्था : काश्मीरसाठी योग एक आकर्षणाचे केंद्र ठरू शकतो. पावसाने आव्हान उभे केल्यानंतरही काश्मीरच्या अनेक लेकींचा योगाबद्दलचा उत्साह मावळला नाही. योगावर त्या ठाम राहिल्या. काश्मीरचे हे दृश्य संपूर्ण देशाला आश्वस्त करणारे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस काश्मिरातील श्रीनगरात साजरा केला. दल सरोवरकाठी खुल्यावर सकाळी 6.30 वाजता हा कार्यक्रम नियोजित होता, पण पावसामुळे अखेर तो एसकेआयसीसी (शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर) सभागृहात हलविला गेला. सकाळी 8 वाजता त्याला सुरुवात झाली. सभागृहात जवळपास 50 जण; तर सभागृहाबाहेर विद्यार्थी-विद्यार्थिनींसह 7 हजारांवर लोकांनी पंतप्रधानांसोबत वज्रासन, शशांकासन, सेतुबंधासनासह अनेक जटिल आसने लीलया केली.
जहाजावर, सीमेवर जवानांचा योग
शिवाय आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांनी, तर लडाखमधील चीनला लागून असलेल्या एलएसीवर (वास्तविक नियंत्रण रेषा) पँगाँग सरोवराकाठी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस दलाच्या जवानांनी योगासने केली. राजस्थानातील वाळवंटापासून ते सिक्कीममधील हिमालय परिसरात उणे तापमानात लष्करी जवानांनी योगासने केली.

Go to Source