लवकरच लग्न करणार राहुल गांधी !
ANI
काँग्रेस नेते राहुल गांधी लग्न कधी करणार? अनेक वर्षांपासून हा प्रश्न टाळणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अखेर त्यांच्या विवाहाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर दिले. नुकतेच राहुल गांधी रायबरेलीतून उमेदवारी दाखल केल्यानंतर एका सभेला संबोधित करत असताना त्यांना पुन्हा या प्रश्नाला सामोरे जावे लागले. ज्याला राहुल गांधींनी हसत उत्तर दिलं.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी महाराजगंज येथील मेला मैदानावर आयोजित निवडणूक सभेला संबोधित करत होते. मेळाव्यातील भाषणाच्या शेवटी, राहुल गांधींनी त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांना मंचावर बोलावले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि रायबरेलीमध्ये प्रचार केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यादरम्यान प्रियांका गांधींनी समोरच्याकडे बोट दाखवत म्हटलं की, आधी या प्रश्नाचं उत्तर द्या, समोरच्या लोकांपैकी कुणीतरी विचारलं होतं की, तुमचं लग्न कधी होणार आहे. त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या त्यांची बहीण प्रियांका गांधी यांनी या प्रश्नाकडे राहुल गांधींचे लक्ष वेधले. तेव्हा राहुल गांधींनी हसत उत्तर दिले, “आता ते लवकर करावे लागेल.” त्यांचे उत्तर ऐकून जमावाने मोठ्याने जल्लोष केला.
राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. रायबरेलीतूनही ते निवडणूक लढवत आहेत. 2004 ते 2019 पर्यंत त्यांनी अमेठीचे प्रतिनिधित्व केले. रायबरेलीमध्ये त्यांचा सामना भाजपचे तीन वेळा आमदार दिनेश प्रताप सिंग यांच्याशी आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.