गोजगा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू
बेळगाव शहरासह परिसरात डेंग्यूची साथ
वार्ताहर /उचगाव
गोजगा येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 25 जून रोजी घडली आहे. सदर युवक हा कॉलेज विद्यार्थी असून डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने गावासह परिसरात घबराट निर्माण झाली आहे. गणेश कल्लाप्पा जंगम (वय 17) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. बेळगाव शहर व परिसरामध्ये डेंग्यूचे ऊग्ण वाढत असल्याच्या अनेक घटना घडत असताना गोजगा येथील गणेश कल्लाप्पा जंगम या महाविद्यालय विद्यार्थ्याचे डेंग्यूने निधन झाले आहे. गणेश जंगम याला गेल्या चार दिवसांपासून ताप असल्यामुळे बेळगाव येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीत गणेशला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होताच त्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता मंगळवारी त्याचे निधन झाले. गणेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. गोजगा गावात मोठ्या अस्वछता असल्याने गटारी स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली होती.
डेंग्यूची साथ
बेळगाव शहर व परिसरात डेंग्यूची साथ आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्यावतीने याविषयी खबरदारी घेऊन प्रत्येक गावामध्ये आरोग्य तपासणी करणे व सर्वांना उकळून पाणी पिणे असा सल्ला देणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य खात्याने त्वरित गावाला भेट देऊन पंचायतीच्यावतीने स्वच्छता राबवणे गरजेचे आहे.
Home महत्वाची बातमी गोजगा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू
गोजगा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू
बेळगाव शहरासह परिसरात डेंग्यूची साथ वार्ताहर /उचगाव गोजगा येथील एका युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 25 जून रोजी घडली आहे. सदर युवक हा कॉलेज विद्यार्थी असून डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने गावासह परिसरात घबराट निर्माण झाली आहे. गणेश कल्लाप्पा जंगम (वय 17) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. बेळगाव शहर व परिसरामध्ये डेंग्यूचे ऊग्ण वाढत असल्याच्या अनेक घटना […]