चार अपघातात चारजण ठार

नावेली, लोटली, घोगळ, मोलेत अपघात : दोन अपघातात पादचाऱ्यांना ठोकरले  मडगाव : नावेली (मडगाव), लोटली व घोगळ येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांना मृत्यू आला. हे अपघात सोमवारी मध्यरात्रीनंतर घडले. त्याचबरोबर सोमवारी रात्रीच सुकतळी-मोले येथे झालेल्या अपघातात कुळे येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. घोगळ-मडगाव येथील बोल्शे सर्कलजवळ झालेल्या एका स्वयं अपघातात ऑलवीन फर्नांडिस या इसमाला मृत्यू आला. बोल्शे […]

चार अपघातात चारजण ठार

नावेली, लोटली, घोगळ, मोलेत अपघात : दोन अपघातात पादचाऱ्यांना ठोकरले 
मडगाव : नावेली (मडगाव), लोटली व घोगळ येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांना मृत्यू आला. हे अपघात सोमवारी मध्यरात्रीनंतर घडले. त्याचबरोबर सोमवारी रात्रीच सुकतळी-मोले येथे झालेल्या अपघातात कुळे येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. घोगळ-मडगाव येथील बोल्शे सर्कलजवळ झालेल्या एका स्वयं अपघातात ऑलवीन फर्नांडिस या इसमाला मृत्यू आला. बोल्शे सर्कलजवळून फर्नांडिस हे आपल्या दुचाकीवरुन केपेच्या दिशेने जात होते. या सर्कलपासून सुमारे 100 मीटर अंतरावरील मुख्य रस्त्यावर पावसामुळे दगडमाती रस्त्यावर आली होती. या रस्त्यावरुन जात असताना फर्नांडिस यांची दुचाकी घसरली आणि दुचाकीचालक रस्त्यावर पडून गंभीररित्या जखमी झाला. गंभीररित्या जखमी झालेल्या फर्नांडिस यांना उपचारासाठी मडगावच्या सरकारी इस्पितळात नेण्यात येत असताना वाटेतच त्यांना मृत्यू आला. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी ‘मृतावस्थेत आणले’ अशी नोंद केली आहे.नावेली येथे झालेल्या अपघातात इनासियो फर्नांडिस या 79 वर्षीय नावेली येथील इसमाला मृत्यू येण्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.
दुचाकीच्या धडकेने पादचारी ठार 
प्राप्त माहितीनुसार सोमवारी सायंकाळी उशिरा इनासियो फर्नांडिस हा नावेली जंक्शनजवळ रस्ता ओलांडत होता. रस्ता ओलांडताना हा इसम अकस्मात रस्त्याच्या मधोमध आल्यामुळे,तेथून जात असलेल्या एका दुचाकीची धडक इनासियोला बसली त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. सोमवारी रात्री त्यांना मडगावच्या सरकारी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार चालू असताना मंगळवारी इनासियो यांचा मृत्यू झाला.
लोटली येथेही पादचारी ठार
सोमवारी मध्यरात्रीनंतर लोटली परिसरात झालेल्या अपघातात एका अज्ञात व्यक्तीला मृत्यू आला. एका अज्ञात वाहनाच्या धडकेने हा पादचारी ठार झाला. वेर्णा औद्योगिक वसाहतीच्या दिशेहून ही अज्ञात व्यक्ती चालत राय गावच्या दिशेने येत होती, असा प्राथमिक अंदाज आहे. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला. असे जरी असले तरी पोलीस या अपघातासंबंधी तपास करीत असल्याची माहिती मिळाली.