महायुतीसाठी कोकण पदवीधरची निवडणूक एकतर्फी- आ.नितेश राणे

महायुतीसाठी कोकण पदवीधरची निवडणूक एकतर्फी- आ.नितेश राणे

कणकवली | प्रतिनिधी
कोकण पदवीधर मतदार संघातील आज होत असलेली निवडणूक ही महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी एकतर्फी आहे. विरोधी उमेदवार अथवा महाविकास आघाडीचे नेते प्रचारासाठी या जिल्ह्यांमध्ये आलेले दिसले नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ठाण्यात एक सभा घेताना दिसले त्या व्यतिरिक्त त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा उमेदवार असतानाही ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये दिसले ही नाहीत. स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारासाठी जे पक्ष व त्यांचे प्रतिनिधी या जिल्ह्यांमध्ये येऊ शकत नाहीत ते या मतदारसंघाचा आणि मतदारांचा विकास करू शकतात का? म्हणूनच ही निवडणूक एकतर्फी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी येथे मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री राणे म्हणाले, आमचे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवून त्यांना श्री. डावखरे यांचा जाहीरनामा दिलेला आहे. निवडणुकीच्या कालावधीत ज्या पक्षाचे उमेदवार व नेते जिल्ह्यात येत नाहीत ते निवडणुकीनंतर येणार का ? याचा विचार पदवीधर मतदारांनी करावा असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.