दारणा नदीत पोहताना वाळू उपश्याच्या खड्ड्यात 13 वर्षीय मुलगा अडकला

नाशिक- दारणा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन शाळकरी मुले वाळू उपश्यामुळे झालेल्या खड्ड्यात घसरले. तिथे पाण्याचा भवरा तयार झाल्याने त्यात एक मुलगा अडकला मात्र दुसऱ्या मुलाने आरडा ओरड केल्याने चेहडी गावातील मुलांनी त्याला बाहेर काढले. त्याची प्रकृती …

दारणा नदीत पोहताना वाळू उपश्याच्या खड्ड्यात 13 वर्षीय मुलगा अडकला

नाशिक- दारणा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन शाळकरी मुले वाळू उपश्यामुळे झालेल्या खड्ड्यात घसरले.

तिथे पाण्याचा भवरा तयार झाल्याने त्यात एक मुलगा अडकला मात्र दुसऱ्या मुलाने आरडा ओरड केल्याने चेहडी गावातील मुलांनी त्याला बाहेर काढले. त्याची प्रकृती चिंताजानक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की मेहराज मुबारक अन्सारी (वय 13,रा. तानाजी नगर, सामनगाव रोड) हा व त्याचा मित्र पोहण्यासाठी चेहडी गाव दारणा बांधराच्या पुढे जुन्या वाहतूक पुलानजीक दुपारी तीन वाजेच्या सुमारास गेले.

 

सदर ठिकाणी मागील काही दिवस वाळू उपसा केला गेला. त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. आंघोळ करण्यासाठी मेहराज व त्याचा मित्र पाण्यात उतरले. त्यावेळी मेहराज याचा पाय घसरत तो वाळू उपसा केलेल्या खड्डडयात गेला व बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या पाहिले असता त्याने पाण्याबाहेर येऊन तो आरडाओरड करू लागला.

 

त्यावेळी गावातील पोहोणाऱ्या युवकांनी नदीपात्रात उड्या घेऊन मेहरजला पाण्या बाहेर काढले. मात्र त्याच्या प्रकृती अस्वस्थ दिसली. माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते राहुल ताजनपुरे यांनी त्यांच्या गाडीत मेहराजला बिटको रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले.

 

त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. राहुल ताजनपुरे यांनी वेळीच कार्य तत्परता दाखवल्याने मेहराज रुग्णालयापर्यंत पोहोचला.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Go to Source