मॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू

मॉरिशसमध्ये 6 भाविकांचा दुर्घटनेत मृत्यू

धार्मिक कार्यक्रमादरम्यान लागली आग
वृत्तसंस्था/ पोर्ट लुईस
महाशिवरात्रीपूर्वी आयोजित झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमादमयान आग लागल्याने 6 हिंदू भाविकांचा मॉरिशसमध्ये मृत्यू झाला आहे. तसेच या दुर्घटनेत अनेक भाविक जखमी झाले आहेत.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविक ग्रँड बेसिन सरोवरापर्यंत पायी प्रवास करत होते. या सरोवराला पूर्व आफ्रिकन देश मॉरिशसमधील हिंदू समुदाय पवित्र मानतो. भाविक लाकूड आणि बांबूने तयार करण्यात आलेल्या एका वाहनावर देवतांची मूर्ती ठेवून सरोवराच्या दिशेने जात होते. याचदरम्यान या वाहनाला आग लागली होती. या वाहनाचा खुला वीजवाहिन्यांशी संपर्क झाला होता. या आगीमुळे 6 भाविकांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अनिल कुमारदीप यांनी दिली आहे. तर भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.