ड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या

ड्रीम लँड बिल्डर्सचे प्रमुख पवन भडाना यांची आत्महत्या

कर्जामुळे आले होते अडचणीत
वृत्तसंस्था/ नोएडा+
उत्तरप्रदेशच्या नोएडा येथे ड्रीम लँड बिल्डर या नावाने प्रसिद्ध उद्योजकाने आत्महत्या केली आहे. कोट्यावधींचे कर्जाचा भार निर्माण झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पवन भडाना यांनी स्वत:च्या घरात फॅनला गळफास लावून घेत आयुष्य संपविले आहे. भडाना यांच्याविरोधात अनेक गुन्हे नोंदविण्यात आले होते. काही काळापूर्वीच भडाना यांची जामिनावर तुरुंगातून सुटका झाली होती. भडाना यांचा मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी तो उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
पवन भडाना हे केवळ 46 वर्षांचे होते. कर्जामुळे पवन भडाना हे मागील काही काळापासून त्रस्त होते. कर्ज भरण्यासाठी अनेक बँका आणि कर्जदात्यांनी त्यांच्यामागे तगादा लावला होता. याचमुळे त्यांनी आयुष्य संपविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता व्यक्त होत आहे.  घटनास्थळावरून कुठलीच सुसाइड नोट मिळाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.