सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा नेतृत्वबदल,
पॅट कमिन्स : नवा कर्णधार, डॅनियल व्हेटोरी : नवे प्रमुख प्रशिक्षक
वृत्तसंस्था/ हैदराबाद
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून गेल्या तीन वर्षांत ही जबाबदारी सोपवलेला तो चौथा खेळाडू ठरला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या ‘आयपीएल’ लिलावात या 30 वर्षीय वेगवान गोलंदाजाला सनराझर्स हैदराबादने तब्बल 20.50 कोटी ऊपयांना करारबद्ध केले होते, ज्यामुळे तो या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वांत महागडा खेळाडू बनला आहे.
त्याने 2023 च्या हंगामात संघाचे नेतृत्व केलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमची जागा घेतली आहे. 2023 च्या हंगामात संघाला मार्करमच्या नेतृत्वाखाली 14 लीग सामन्यांत फक्त चार विजय नोंदवता आले होते आणि ते तळाशी फेकले गेले होते. या वर्षी सनरायझर्स इस्टर्न केपला दक्षिण आफ्रिकेतील आरंभीच्या ‘एसए20’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यास हातभार लावताना मार्करमने बजावलेल्या पराक्रमामुळे तो संघात कायम राहिलेला असला, तरी त्याच्या जोरावर तो कर्णधारपद राखू शकलेला नाही. गेल्या तीन वर्षांपासून सनरायझर्स हैदराबाद सतत नेतृत्व बदलत आला आहे. त्याची सुऊवात 2021 पासून झाली.
ज्याने 2016 मध्ये संघाला एकमेव विजेतेपद मिळवून दिले आणि सहा वर्षे संघासोबत घालवली त्या ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरला 2021 च्या हंगामाच्या मध्यास सनरायझर्स हैदराबादने त्यांचे सहापैकी पाच सामने गमावल्यानंतर कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते आणि नंतर त्याची पूर्णपणे हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडे पुन्हा एकदा संघाची धुरा सोपवण्यात आली होती. विल्यमसनने 2022 च्या हंगामात नेतृत्व केले आणि संघाने क्रमवारीत आठवे स्थान पटकावल्यानंतर अखेर त्याला संघातून मुक्त करण्यात आले.
कमिन्स यापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचे दिल्ली कॅपिटल्स) यांच्यासाठी खेळलेला आहे. मात्र आयपीएलमध्ये नेतृत्व सांभाळण्ण्याची त्याची ही पहिलीच खेप असेल. कर्णधार बदलण्याच्या व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबादने नवीन मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. न्यूझीलंडचा माजी डावखुरा फिरकीपटू आणि कर्णधार डॅनियल व्हेटोरीने ब्रायन लाराची जागा घेतली आहे. याशिवाय न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू जेम्स फ्रँकलिन दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनच्या जागी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2024 मधील मोहिमेची सुऊवात 23 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविऊद्ध ईडन गार्डन्सवर करेल.
Home महत्वाची बातमी सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा नेतृत्वबदल,
सनरायझर्स हैदराबादकडून पुन्हा नेतृत्वबदल,
पॅट कमिन्स : नवा कर्णधार, डॅनियल व्हेटोरी : नवे प्रमुख प्रशिक्षक वृत्तसंस्था/ हैदराबाद ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पॅट कमिन्सची आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून गेल्या तीन वर्षांत ही जबाबदारी सोपवलेला तो चौथा खेळाडू ठरला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या ‘आयपीएल’ लिलावात या 30 वर्षीय वेगवान गोलंदाजाला सनराझर्स हैदराबादने तब्बल […]