बाची चेकपोस्टवर 6.65 लाख रुपये जप्त
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव-चंदगड रोडवरील बाचीजवळ चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी मंगळवारी वाहनाची झडती घेऊन 6 लाख 65 हजार रुपये जप्त करण्यात आले. यावेळी संबंधितांनी कागदपत्रे हजर केली नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या चेकपोस्टवर निवडणूक अधिकारी आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी 12.15 च्या सुमारास एका वाहनाची झडती करण्यात आली. त्यावेळी पोलिसांना 6 लाख 65 हजार रुपये आढळून आले. अमुल विद्याधर यांची ही रक्कम आहे. एसएसटी पथकाचे परशराम दीक्षित व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूक 7 मे रोजी होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात जाणाऱ्या रस्त्यांवर व राज्यातील अंतर्गत जिल्ह्यांच्या हद्दीवर चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे.
Home महत्वाची बातमी बाची चेकपोस्टवर 6.65 लाख रुपये जप्त
बाची चेकपोस्टवर 6.65 लाख रुपये जप्त
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव-चंदगड रोडवरील बाचीजवळ चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. त्याठिकाणी मंगळवारी वाहनाची झडती घेऊन 6 लाख 65 हजार रुपये जप्त करण्यात आले. यावेळी संबंधितांनी कागदपत्रे हजर केली नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या चेकपोस्टवर निवडणूक अधिकारी आणि पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी 12.15 च्या सुमारास एका वाहनाची झडती […]