छत्तीसगडमध्ये 10 नक्षलींना कंठस्नान

छत्तीसगडमध्ये 10 नक्षलींना कंठस्नान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक रोखे कशा प्रकारे काढण्यात आले आणि त्यांची विक्री कशाप्रकारे करण्यात आली, याची माहिती देण्यास स्टेट बँक ऑफ इंडियाने नकार दिला आहे. ही मागणी माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली होती. निवडणूक रोख्यांसंबंधीची सर्वसाधारण क्रियान्वयन प्रक्रिया (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) स्पष्ट करण्याचा अधिकार बँकेला नाही, असे व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
माहिती अधिकार कायद्याच्या अनुच्छेद 8 (1)(ड) अनुसार आर्थिक व्यवहार, व्यापारी व्यवहार, व्यापारी किंवा आर्थिक संबंधांमधील गोपनीय बाबी आणि बौद्धिक संपदा यांच्यासंबंधातील माहिती उघड करता येत नाही. अशी माहिती उघड करणे हे या कायद्याच्या विरुद्ध आहे, असे स्टेट बँकेने उत्तरात स्पष्ट केले आहे.
अंजली भारद्वाज यांचा अर्ज
निवडणूक रोख्यांसंबंधी क्रियान्वयन प्रक्रिया स्टेट बँकेने स्पष्ट करावी, अशी मागणी करणारा अर्ज अंजली भारद्वाज नामक कार्यकर्तीने सादर केला होता. तथापि, कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करुन स्टेट बँकेने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जी माहिती उघड करण्याचा आदेश दिला होता, ती सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आली असून आता कोणतीही माहिती स्टेट बँकेकडे शिल्लक उरलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले.