मणिपूरमध्ये 2 चौक्मया, 70 घरांची जाळपोळ

मणिपूरमध्ये 2 चौक्मया, 70 घरांची जाळपोळ

जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार : पोलीस प्रमुखांची बदली
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या जिरीबाम जिह्यात दोन दिवसांपासून पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. एका वृद्ध इसमाच्या मृत्यूनंतर दोन समूहातील संघर्षात दोन पोलीस चौक्मया, एक वन कार्यालय आणि 70 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. संशयित हल्लेखोर 3-4 बोटीतून बराक नदीतून घुसले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यापूर्वी गुरुवार, 6 जून रोजी काही मैतेई गावे आणि पोलीस चौक्मयांवर हल्ले झाले होते. दुसरीकडे, चिन-कुकी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या बांगलादेश सरकारच्या निर्देशानंतर 200 हून अधिक दहशतवादी भारतीय सीमावर्ती प्रदेशात पळाले आहेत. ते मिझोराममार्गे मणिपूरमध्ये प्रवेश करू पाहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिरीबाम जिल्ह्यातील जिरी मुख व छोटा बेकारा या पोलीस चौकी आणि गोखळ वन बीट कार्यालयात जाळपोळ झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही तासांतच जिल्हा पोलीस प्रमुखांची बदली करण्यात आली आहे. आदेशानुसार, जिरीबामचे एसपी ए. घनश्याम शर्मा यांची मणिपूर पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या अतिरिक्त संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे, इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अंगोमचा बिमोल अकोइजाम यांनी राज्य सरकारला जिरीबाममधील लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याची विनंती केली.
मणिपूरमध्ये मे 2023 पासून जातीय हिंसाचार सुरू आहे. येथील डोंगराळ भागात राहणारे मैतेई आणि कुकी यांच्यातील जातीय संघर्षात 200 हून अधिक लोक मरण पावले आहेत. तसेच हजारो लोक बेघर झाले आहेत. मैतेई, मुस्लीम, नागा, कुकी आणि गैर-मणिपुरी यांसह विविध वांशिक रचना असलेले जिरीबाम आतापर्यंत जातीय संघर्षापासून दूर होते. मात्र, गुऊवारी 6 जून रोजी संध्याकाळी संशयित अतिरेक्मयांनी 59 वषीय व्यक्तीची हत्या केली. सोईबाम सरतकुमार सिंह नावाचा हा व्यक्ती 6 जून रोजी आपल्या शेतात गेला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला. नंतर त्याचा मृतदेह सापडल्यानंतर त्यावर धारदार शस्त्राद्वारे केलेल्या जखमेच्या खुणा होत्या. या प्रकारानंतर स्थानिक लोकांनी काही ठिकाणी जाळपोळ केली. तणाव वाढताच या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती.