काँग्रेसकडून आणखी 17 उमेदवारांची घोषणा

काँग्रेसकडून आणखी 17 उमेदवारांची घोषणा

आंध्रप्रदेशात शर्मिला यांना तिकीट : पक्षाकडून आतापर्यंत एकूण 231 उमेदवार जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारांची 11 वी यादी जारी केली आहे. यात 4 राज्यांमधील 17 उमेदवारांची नावे सामील आहेत. पक्षाकडून आतापर्यंत 231 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या कडपा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने वाय.एस. शर्मिला यांना तिकीट दिले आहे. पक्षाने आंध्रप्रदेशातील 5 जागा, बिहारच्या 3 तर ओडिशातील 8 आणि बंगालच्या एका जागेकरता उमेदवार जाहीर केला आहे.
काँग्रेसकडून बिहारमधील उमेदवारांची ही पहिलीच यादी ठरली आहे. यात दोन मुस्लीम नेत्यांना स्थान मिळाले आहे. खासदार मोहम्मद जावेद हे किशनगंजमध्ये पक्षाचे उमेदवार असतील. तर तारिक अन्वर यांना कटिहार मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. भागलपूरमध्ये अजित शर्मा हे पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणार आहेत.
आंध्रप्रदेशात यावेळी त्रिकोणी लढत दिसून येणार आहे. राज्यात जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआर काँग्रेस सत्तेवर आहे. तर भाजपसोबत तेलगू देसम पक्ष आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने आघाडी केली आहे. दुसरीकडे जगनमोहन यांच्या भगिनी वाय.एस. शर्मिला रेड्डी या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत.
काँग्रेसने शर्मिला यांना कडपा येथे उमेदवारी दिली आहे. कडपा हा वायएसआर काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. वायएसआर काँग्रेसने येथे वाय.एस. अविनाश  रे•ाr यांना उमेदवारी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अविनाश रे•ाr हे काँग्रेसचे उमेदवार होते.
ओडिशाच्या बारघाट मतदारसंघात संजय भोई काँग्रेसचे उमेदवार असतील. तर सुंदरगढमध्ये जनार्दन देहुरी, बोलांगीरमध्ये मनोज मिश्रा, कालाहांडीमध्ये द्रौपदी माझी, नवरंगपूरमध्ये भुजबळ माझी, कंधमाल येथे चांद नायक, बेरहमपूर येथे रश्मी पटनायक आणि कोरापूटमध्ये सप्तगिरी उलका यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग मतदारसंघात मुनीश तमांग यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.