बिनधास्त ‘मगरमित्र’
‘मगर’ हा भीतीदायक प्राणी आहे. तो प्रामुख्याने पाण्यात आणि काही प्रमाणात भूमीवर राहतो. त्याचे आक्राळविक्राळ स्वरुप थरकाप उडविणारे असते. त्याचा जबडा मोठा आणि दणकट असतो. म्हैस, हरीण इत्यादी प्राणी तो अख्खेच्या अख्खे गिळून टाकू शकतो. जबड्याप्रमाणे त्याचे दातही मजबूत आणि मोठे असतात. या प्राण्याचे सविस्तर वर्णन करण्याचे कारण असे, की त्याच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. मगरींची वस्ती असणाऱ्या पाणथळ स्थानांजवळ इतर जनावरे तर सोडाच, पण हत्तीही सहसा जात नाहीत. पण याच मगरींशी जीवाभावाची मैत्री असलेला एक व्यक्ती आहे. त्याने एका मगरीशी एवढी मैत्री केली आहे, की ती त्याला कोणताही त्रास देत नाही. इतकेच नव्हे, तर इतरही मगर त्याला आपल्यात सामावून घेतात. त्याच्याशी खेळतात आणि तो ही आपल्या सवंगड्यांशी वागावे तसे या मगरीशी वागतो. निदान वरकरणी पाहणाऱ्याला तसे दिसून येते.
मात्र, हा चमत्कार नाही. तसेच मगरीची अशी मैत्री माणसाशी होत नाही. मगरीला संधी मिळाली तर ती माणसाला गिळल्याशिवाय राहणार नाही. तरीही मगर त्याला चावत नाही कारण तो एका विशिष्ट तंत्राचा उपयोग करतो. मगरीच्या कोणत्या भागाला स्पर्श झाल्यास ती हल्ला करते हे त्याला माहीत आहे. त्यामुळे ते टाळून तो मगरीच्या जवळ जाऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. अर्थात असा प्रयोग अन्य कोणीही करु नये असा सावधाननेचा इशाराही त्यांना दिला आहे.
Home महत्वाची बातमी बिनधास्त ‘मगरमित्र’
बिनधास्त ‘मगरमित्र’
‘मगर’ हा भीतीदायक प्राणी आहे. तो प्रामुख्याने पाण्यात आणि काही प्रमाणात भूमीवर राहतो. त्याचे आक्राळविक्राळ स्वरुप थरकाप उडविणारे असते. त्याचा जबडा मोठा आणि दणकट असतो. म्हैस, हरीण इत्यादी प्राणी तो अख्खेच्या अख्खे गिळून टाकू शकतो. जबड्याप्रमाणे त्याचे दातही मजबूत आणि मोठे असतात. या प्राण्याचे सविस्तर वर्णन करण्याचे कारण असे, की त्याच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीही […]