झिंबाब्वेचा बांगलादेशवर विजय

वृत्तसंस्था/ ढाका पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात झिंबाब्वेने यजमान बांगलादेशचा 9 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपला संभाव्य व्हाईटवॉश टाळला बांगलादेशने ही मालिका 4-1 अशी जिंकली. झिंबाब्वेच्या बेनेटला ‘सामनावीर’ तर बांगलादेशच्या तस्किन अहमदला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. रविवारच्या शेवटच्या सामन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. […]

झिंबाब्वेचा बांगलादेशवर विजय

वृत्तसंस्था/ ढाका
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात झिंबाब्वेने यजमान बांगलादेशचा 9 चेंडू बाकी ठेऊन 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत आपला संभाव्य व्हाईटवॉश टाळला बांगलादेशने ही मालिका 4-1 अशी जिंकली. झिंबाब्वेच्या बेनेटला ‘सामनावीर’ तर बांगलादेशच्या तस्किन अहमदला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
रविवारच्या शेवटच्या सामन्यात झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 6 बाद 157 धावा जमविल्या. त्यानंतर झिंबाब्वेने 18.3 षटकात 2 बाद 158 धावा जमवित विजय नोंदविला.
बांगलादेशच्या डावामध्ये मेहमुद्दुल्लाने 44 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 54, कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 28 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 36, शकिब अल हसनने 17 चेंडूत 1 षटकारासह 21, जाकर अलीने 11 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावा जमविल्या. बांगलादेशचे पहिले 3 फलंदाज केवळ 15 धावांत बाद झाल्यानंतर कर्णधार नजमुल हुसेन व मेहमुद्दुल्ला यांनी चौथ्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या डावात 6 षटकार आणि 12 चौकार नेंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे मुझारबनी, बेनेट यांनी प्रत्येकी 2 तर मासाकेझा व जाँग्वे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेच्या डावात सलामीच्या बेनेटने कर्णधार सिकंदर रझा समवेत दुसऱ्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी केली. बेनेटने 49 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकारांसह 70 तर कर्णधार सिकंदर रझाने 46 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 72 धावा झोडपल्या. झिंबाब्वेच्या डावात 9 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे शकिब अल हसन आणि सैफुद्दीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश 20 षटकात 6 बाद 157 (नजमुल हुसेन शांतो 36, मेहमुदुल्ला 54, शकिब अल हसन 21, जाकर अली 24, मुझारबनी व बेनेट प्रत्येकी 2 बळी, मासाकेझा, जाँग्वे प्रत्येकी 1 बळी), झिंबाब्वे 18.3 षटकात 2 बाद 158 (बेनेट 70, मेरुमनी 1, सिकंदर रझा नाबाद 72, कॅम्पबेल नाबाद 8, अवांतर 7, शकीब अल हसन व सैफुद्दीन प्रत्येकी 1 बळी).