जि.पं.सभागृहाचे लवकरच लोकार्पण
अत्याधुनिक सुविधांसह आकर्षक व्यवस्था : सभागृहाचे 90 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण
बेळगाव : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून आता जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्हा पंचायत सभागृह लवकरच अस्तित्वात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हा पंचायतकडून अत्याधुनिक सभागृह लोकार्पण करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. लवकरच लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार आहे. जिल्हा पंचायत सभागृहाला अत्याधुनिक टच देण्यात आला आहे. सभागृहाच्या छताला गळती लागल्याने ठिकठिकाणी छताचे नुकसान झाले होते. याबरोबरच सभागृहातील साऊंड सिस्टीम व्यवस्थाही खराब झाली होती. त्यामुळे सभागृहाला अत्याधुनिक स्वरुपातील व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर काम जवळपास पूर्ण होत आले असून लवकरच अत्याधुनिक सभागृह सेवेत दाखल होणार आहे.
सभागृहातील माईक व्यवस्था व साऊंड सिस्टीम अत्याधुनिक स्वरुपाच्या दृष्टिने उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच सभागृहातील छताचे पंखे काढून त्या ठिकाणी वातानुकुलीत सुविधा बसविण्यात आली आहे. याबरोबरच प्रकाश योजना लक्षात घेऊन ठिकठिकाणी अत्याधुनिक स्वरुपातील लायटींग व्यवस्थाही केली आहे. सभागृहातील व्यासपीठाचा लूक बदलण्यात आला आहे. त्याठिकाणी मॅट घालून नवीन टच देण्यात आला आहे. सभागृहातील सदस्यांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रोजेक्टर बसविण्यात आले आहे. त्यामुळे सभागृहाला एक वेगळे स्वरूप लाभले आहे. जवळपास 90 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून लवकरच सभागृहाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी जि.पं.सभागृहाचे लवकरच लोकार्पण
जि.पं.सभागृहाचे लवकरच लोकार्पण
अत्याधुनिक सुविधांसह आकर्षक व्यवस्था : सभागृहाचे 90 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण बेळगाव : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून आता जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्हा पंचायत सभागृह लवकरच अस्तित्वात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हा पंचायतकडून अत्याधुनिक सभागृह लोकार्पण करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. लवकरच लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार आहे. जिल्हा पंचायत सभागृहाला अत्याधुनिक टच देण्यात आला आहे. सभागृहाच्या […]