युवराज, मयुरेश व अर्णव यांची राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी निवड

युवराज, मयुरेश व अर्णव यांची राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : बेंगलोर येथे कर्नाटक राज्य जलतरण संघटनेच्या वतीने हलसूर कॅन्सिंगटन जलतरण तलावात घेण्यात आलेल्या राज्य पातळीवर डायव्हिंग स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना 3 सुवर्ण 2 रौप्य व एक कास्य असे एकूण 7 पदके संपादन केली. बेगळुर येथे झालेल्या स्पर्धेत युवराज मोहनगेकरने ग्रुप 3 मध्ये 1 मी. व 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये 2 सुवर्ण पदके पटकावून वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळविली.
मयुरेश जाधवने ग्रुप 1 मध्ये 1 मी. स्प्रिंग बोर्ड मध्ये सुवर्ण व 3 मी. स्प्रिंग बोर्ड मध्ये रौप्य पदक संपादन केले. अर्णव कुलकर्णीने ग्रुप 2 मध्ये 3 मी. स्प्रिंगबोर्ड मध्ये रौप्य व 1 मी. स्प्रिंग बोर्ड मध्ये कास्यपदक संपादन केले. वरील सर्व जलतरणपटूंची जुलै 6 ते 9 रोजी मध्यप्रदेश इंदोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदनीय निवड झाली आहे. वरील सर्व जलतरणपटूना एन आय एस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, शिवराज मोहिते यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते तर क्लबचे चेअरमन अॅड. मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभते.