भारत एफसी संघाकडे फॅब सुपर चषक

राहुल के.आर. शेट्टी उपविजेता, अभिषेक चेरेकर उत्कृष्ट खेळाडू बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब सुपर चषक निमंत्रितांच्या सेव्हेन ए-साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत एफसीने राहुल के. आर. शेट्टी संघाचा सडनडेथमध्ये 4-3 असा पराभव करून फॅब सुपर चषक पटकाविले. अभिषेक चेरेकर उत्कृष्ट खेळाडू, राहिद राऊत याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.वडगाव येथील सीआर सेव्हेन टर्फ फुटबॉल मैदानावरती रविवारी आयोजित […]

भारत एफसी संघाकडे फॅब सुपर चषक

राहुल के.आर. शेट्टी उपविजेता, अभिषेक चेरेकर उत्कृष्ट खेळाडू
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित फॅब सुपर चषक निमंत्रितांच्या सेव्हेन ए-साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत एफसीने राहुल के. आर. शेट्टी संघाचा सडनडेथमध्ये 4-3 असा पराभव करून फॅब सुपर चषक पटकाविले. अभिषेक चेरेकर उत्कृष्ट खेळाडू, राहिद राऊत याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.वडगाव येथील सीआर सेव्हेन टर्फ फुटबॉल मैदानावरती रविवारी आयोजित केलेल्या सुपर-6 फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टी संघाने टेनटेन एफसीच्या टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव केला. या सामन्यात 8 व्या मिनिटाला के. आर. राहुल शेट्टीच्या नदीम मकानदारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात टेनटेन एफसीच्या अनिकेत मानेने बरोबरीचा गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये राहुल के. आर. शेट्टी संघाने 3-1 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात ओल्ड फॅट संघाने साईराज वॉरियर्स संघाचा टायब्रेरमध्ये 2-1 असा पराभव केला. तिसऱ्या समान्यात राहुल के. आर. शेट्टी संघाने ओल्ड फॅटस संघाचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला मिथिल मंडोळकरने पहिला गोल केला. 22 व्या मिनिटाला ओल्ड फॅटच्या रिगन डिलीमाने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 30 व्या मिनिटाला राहुल के. आर. शेट्टीच्या नदीम मकानदारच्या पासवर शादाब मकानदारने गोल करून 2-1 अशी महत्वाची आघाडी मिळवून दिली.
पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात राहुल के. आर. शेट्टी संघाने ग्रो स्पोर्ट्स संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला मिथिल मंडोळकरच्या पासवर नजिब इनामदारने पहिला गोल केला. तर 18 व्या मिनिटाला नजिबच्या पासवर आझान शेखने गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात ग्रो स्पोर्ट्स संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारत एफसीने ग्रो स्पोर्ट्सचा 3-2 असा निसटता पराभव केला. या सामन्यात 12व्या मिनिटाला ग्रो स्पोर्ट्सच्या अबुजर बिस्तीच्या पासवर धनंजय सुळगेकरने पहिला गोल केला. तर 24 व्या मिनिटाला सुळगेकरच्या पावसवर अबुजर बिस्तीने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 26 व्या मिनिटाला सौरभ धामणेकरच्या पासवर अमृत मण्णूरकरने पहिला गोल केला. 28 व्या मिनिटाला अमृत मण्णूकरच्या पासवर सौरभ धामणेकरने दुसरा गोल करून 2-2 अशी बरोबरी केली. 33 व्या मिनिटाला भारत एफसीच्या अमृत मण्णूरकरने मध्यरेषेपासून सरळ चेंडू गोल मुखात लाथाडून गोलात रूपांतर करीत 3-2 अशी आघाडी मिळवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला.
अंतिम सामन्याचे उद्घाटन पुरस्कृर्ते शेखर जाणवेकर, अश्विन निंगण्णावर, उमेश मजुकर, प्रदिप मुन्नोळ्ळी, विजय रेडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून करण्यात आले. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. पंच इम्रान बेपारीने टायब्रेकर नियमाचा वापर केला. टायब्रेकरमध्ये दोन्ही संघानी 3-3 अशी बरोबरी केली. राहुल के. आर. शेट्टीतर्फे नजिब इनामदार, नदीम मकानदार, इदायत मकानदार यांनी गोल केले. तर भारत एफसीतर्फे वैभव नेसरीकर, अमृत मण्णूरकर,  ब्राईन जोसेफ यांनी गोल केले. त्यानंतर पंचानी सडनडेथ नियमांचा वापर करीत त्यामध्ये पहिल्या फटक्यात मिथिल मंडोळकरने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. पण भारत एफसीच्या अभिषेक चेरेकरने आपल्या अनुभवच्या जोरावर गोल करून विजय मिळवून देण्यास सिंहाचा वाटा उचलला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शेखर जाणवेकर, अश्विन निंगण्णावर, उमेश मजुकर, प्रदिप मुन्नोळ्ळी, विजय रेडेकर, ओंमकार कुंडेकर, अमरदिप पाटील, साहिल मांगले, विवेक सनदी, शुभम यादव, प्रदिप राऊत यांच्या हस्ते विजेत्या भारत एफसी संघाला आकर्षक चषक व 15000 रूपये रोख तर उपविजेत्या राहुल शेट्टी संघाला आकर्षक चषक व 10 हजार रूपये रोख देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अभिषेक चेरेकर भारत एफसी राहिद राऊत राहुल के. आर. शेट्टी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून इम्रान बेपारी यांनी काम पाहिले.