तर रेल्वे कार्यालयावर चाबूक मोर्चा काढणार; माजी आमदार नितीन शिंदे 

तर रेल्वे कार्यालयावर चाबूक मोर्चा काढणार; माजी आमदार नितीन शिंदे 

चिंतामणीनगर पूल रखडल्याने नुकसान

सांगली प्रतिनिधी

चिंतामणीनगरच्या पुलाचे काम रखडल्याने नागरिकांसह व्यावसायिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. सांगलीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ठेकेदाराची मागणी नसतानाही चिंतामणीनगरच्या पुलासाठी 15 ऑगस्टची मुदतवाढ ा†दली आहे. मात्र 31 जुलैपर्यंत पूल पूर्ण झाला नाही तर रेल्वेच्या कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार ा†नतीन शिंदे यांनी दिला. दरम्यान सत्ताधाऱ्यांसह विरोधकही याबाबत गप्प आहेत, हे दुर्देव असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान चिंतामणीनगरचा पूल रखडला असतानाही इतर पुलांची कामे सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सांगली बाजारपेठेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र चिंतामणीनगरचा पूल पूर्ण झाल्या†शवाय इतर पुलांची कामे सुरू करू देणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
ते म्हणाले, चिंतामणीनगर येथील 24 कोटीचा पूल पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यामुळे व्यापारी व उद्योजकांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू आहे. परंतु लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवत नाहीत. विरोधकही गप्प आहेत. वसगडे येथील पुलाच्या कामासाठी एक मा†हना तो रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पंचशील नगर रस्त्यावर रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी तो मार्ग बंद करण्याच्या नादात प्रशासन आहे.
सांगली ते पेठ नाका रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून लोक नांद्रे-पलूस मार्गे कराडला जातात. ा†शवाय कृपामाई जवळचा पूल धोकादायक झालेला आहे. त्यामुळे सांगलीकडे येणारे सगळे मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. सांगलीची बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. सांगलीत कोण येऊ शकणार नाही.
माजी नगरसा†वका अॅड. स्वाती शिंदे म्हणाल्या, चिंतामणीनगरचा रेल्वेचा उड्डाणपूल 31 जुलैपर्यंत पूर्ण करा. त्यापूर्वीच इतर पुलांची कामे काढण्याचा प्रयत्न केला तर तो उधळून लावू. जिह्यातले सर्वपक्षीय आमदार या भागातून जा-ये करतात त्यांनी हा प्रŽ सभागृहात उपस्थित करून चर्चा घडवून आणावी. पुलाचे काम रखडल्याने ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाल आहे, त्यांना सभागृहामध्ये आवाज उठवून नुकसान भरपाई मिळवून द्यावी आा†ण त्या ठेकेदाराला दंड करून त्याच्यावर कारवाई करून त्याचा काळ्या यादीमध्ये समावेश करावा. यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे सांगली शहराध्यक्ष संजय जाधव, सा†चन देसाई यांच्यासह व्यापारी व नागा†रक उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी काढली दुकाने विकायला
माधवनगर व्यापारी असा†सएशनचे अध्यक्ष प्रदीप बोथरा म्हणाले, ा†जह्यातील लोकप्रा†ता†नधींचे लक्ष या प्रŽाकडे वेधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दुर्दैवाने अजूनही हा प्रŽ गांभीर्याने घेतला जात नाही. पुलाची मुदत संपून सहा मा†हन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी लोकांच्या हाल अपेष्टेकडे गांभिर्याने बघत नाही. सांगलीला लोकांनी येऊ नये, असे हे षडयंत्र आहे. एखादी सोय करत असताना गैरसोयीचा ा†वचार अगोदर करायला हवा. काही व्यापाऱ्यांनी दुकाने विकायला काढली आहेत.