पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस ह्या प्रवासी रेल्वेचा मागून येणाऱ्या अन्य मालगाडी द्वारे धडक देऊन गंभीर अपघात घडला आहे. या दुर्दैवी अपघातातील मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे, तर 46 जण जखमी झाले आहेत. आज सोमवारी (17 जून) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
कांचनजंगा एक्सप्रेस आसामच्या गुवाहाटीहून पश्चिम बंगालच्या सियालदहला जात होती. या अपघातामुळं त्या मार्गावरील ईतर 8 रेल्वे रद्द झाल्या आहेत, तर 24 रेल्वेंचे तात्पुरते मार्ग बदलण्यात आले आहेत.
न्यू जलपैगुडीजवळ ही प्रवासी गाडी उभी होती, तेव्हा मागून मालगाडी येऊन धडकली. कांचनजंगा एक्सप्रेसचे तीन डबे अपघातामुळे रुळावरून घसरले.
दार्जिलिंगचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक रॉय यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, “कांचनजंगा एक्सप्रेस उभी होती आणि पाठीमागून आलेल्या मालगाडीने टक्कर दिली. त्यामुळे तीन डब्बे पटरीवरुन उतरले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्ही त्यांना बाहेर काढले आहे आणि रुग्णालयात दाखल केले आहे.”
मालगाडी पायलटने सिग्नल तोडला !
मालगाडीला धडकल्यानंतर कांचनजंघा एक्सप्रेसचा मागचा भाग पूर्णपणे हवे लटकत असल्याचं घटनास्थळावरील फोटोंंवरून स्पष्ट होत होतं.
रेल्वे बोर्डाचे सीईओ आणि अध्यक्ष जया वर्मा यांच्या मते मालगाडीनं सिग्नल तोडत कांचनजंघा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या धडकेनं कांचनजंघा एक्सप्रेसच्या मागच्या बाजुला गार्डचा डबा आणि दोन पार्सल व्हॅनचं प्रचंड नुकसान झालं आहे.
कांचनजंघा एक्सप्रेसमधील सुमारे 1300 सुरक्षित प्रवाशांना त्याच रेल्वेच्या सुरक्षित डब्यांमधून पुढं रवाना करण्यात आलं, असं नॉर्थ फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. या घटनेत मालगाडीच्या लोको पायलट ड्रायव्हरसह कांचनजंघा एक्सप्रेसच्या गार्डचाही मृत्यू झाला आहे.
अपघात कसा घडला ?
काल दिनांक १६ रविवारी सकाळी कांचनजंघा एक्सप्रेस त्रिपुराची राजधानी आगरतळाहून सियालदहकडे रवाना झाली होती. गुवाहाटी स्टेशन मार्गे ही प्रवासी रेल्वे निघाली होती. आज दिनांक १७ रोजी सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजता कांचनजंघा एक्सप्रेस रेल्वेनं पश्चिम बंगालमधील न्यू जलपैगुडी रेलवे स्टेशन ओलांडलं.
त्यावेळी ही रेल्वे जवळपास अर्धातास उशिराने धावत होती. त्यानंतर काही वेळानं सुमारे पाऊणे नऊ वाजता कांचनजंघा एक्सप्रेस रंगापानी-छत्रसाल रेल्वे सेक्शनमध्ये पोहोचली. त्यावेळी मागून येणाऱ्या एका मालवाहू कंटेनर ट्रेननं या उभ्या प्रवासी रेल्वेला जब्बर धडक दिली. या अपघातानंतर कांचनजंघा एक्सप्रेसचा मागचा भाग आणि मालगाडीच्या इंजीनसह त्याचा पुढचा भाग पटरीवरून घसरला.
रेल्वेकडून जया वर्मा यांनी जी माहिती दिली आहे, त्यानुसार मुताबिक़ मालगाडी थांबवण्यासाठी लाल सिग्नल देण्यात आला होता. परंतु, अनावधानाने लोको पायलटने माल गाडी थांबवली नाही. पुढं जाऊन ती वळण ट्रॅकवरील उभ्या असलेल्या कांचनजंघा एक्सप्रेसला मागून धडकली.
रेल्वे मेन्स फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी केलेल्या दाव्यानुसार, मालगाडीचा पायलट सततच्या ड्युटीमुळं प्रचंड थकलेला होता. त्यामुळं त्याला आरामाची अत्याधिक गरज होती. पण सोमवारी त्याला तातडीने पुन्हा ड्युटी देण्यात आली होती.
रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी घटनेनंतर मृतांच्या कुटुंबासाठी 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
त्याशिवाय गंभीर जखमींसाठी 2.5 लाख आणि किरकोळ जखमी असणाऱ्यांसाठी 50 हजार नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की, NFR झोनमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
आपत्कालीन हेल्पलाइन नंबर- लुमडिंग स्टेशन
03674263958
03674263831
03674263120
03674263126
03674263858
आपत्कालीन हेल्पलाइन नंबर-गुवाहाटी स्टेशन
03612731621
03612731622
03612731623
आपत्कालीन हेल्पलाइन नंबर- कटिहार
09002041952
9771441956