ड्रोनमधून पाठविलेली शस्त्रास्त्रे-रोकड जप्त

वृत्तसंस्था/ श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील अखनूरमध्ये रविवारी सकाळी ड्रोनने टाकलेली दोन पाकिटे लष्कराला सापडली आहेत. यामध्ये शस्त्रे आणि रोख रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. या भागातच शनिवारी सकाळी लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. पाळत ठेवणाऱ्या पॅमेऱ्यांमध्ये चार दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करताना दिसून आले होते. घुसखोरीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या […]

ड्रोनमधून पाठविलेली शस्त्रास्त्रे-रोकड जप्त

वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील अखनूरमध्ये रविवारी सकाळी ड्रोनने टाकलेली दोन पाकिटे लष्कराला सापडली आहेत. यामध्ये शस्त्रे आणि रोख रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. या भागातच शनिवारी सकाळी लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. पाळत ठेवणाऱ्या पॅमेऱ्यांमध्ये चार दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करताना दिसून आले होते. घुसखोरीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ठार झालेल्या एका दहशतवाद्याचा मृतदेह त्याच्या तीन साथीदारांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे ओढत नेला होता. घुसखोरीच्या या घटनेनंतर सीमावर्ती भागातील गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यानच लष्कराला शस्त्रास्त्रे आणि रोख रक्कम असलेली पाकिटे सापडली आहेत