‘आयएनएस इंफाळ’चे उद्या जलावतरण

ब्राह्मोससह आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज वृत्तसंस्था/ कोलकाता समुद्रातील चीनच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आपली सागरी क्षमता वाढवण्यासाठी 26 डिसेंबर रोजी आयएनएस इंफाळचे जलावतरण करणार आहे. आयएनएस इंफाळ मुंबई डॉकयार्ड येथे कार्यान्वित होणार आहे. या सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. यानंतर ही युद्धनौका वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये सामील होईल. 20 ऑक्टोबर 2023 रोजी बंदर आणि […]

‘आयएनएस इंफाळ’चे उद्या जलावतरण

ब्राह्मोससह आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज
वृत्तसंस्था/ कोलकाता
समुद्रातील चीनच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आपली सागरी क्षमता वाढवण्यासाठी 26 डिसेंबर रोजी आयएनएस इंफाळचे जलावतरण करणार आहे. आयएनएस इंफाळ मुंबई डॉकयार्ड येथे कार्यान्वित होणार आहे. या सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. यानंतर ही युद्धनौका वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये सामील होईल.
20 ऑक्टोबर 2023 रोजी बंदर आणि समुद्रात चाचणी घेतल्यानंतर ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ईशान्येतील शहराच्या नावावर आधारित इंफाळ ही पहिली युद्धनौका आहे. राष्ट्रपतींनी 16 एप्रिल 2019 रोजी याच्या निर्मितीला मंजुरी दिली होती. ही विध्वंसक युद्धनौका पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या ब्राह्मोस, अँटीशिप सेन्सर्ड क्षेपणास्त्र, आधुनिक शस्त्रे, पाळत ठेवणारे रडार, 76 एमएम रॅपिड माऊंट गन, पाणबुडीविरोधी आणि टॉर्पेडोने सुसज्ज आहे. या युद्धनौकेतील 75 टक्के यंत्रणा पूर्णपणे स्वदेशी आहे. घ्ऱ्ए इम्फाळ ही विशाखापट्टणम श्रेणीतील चार विनाशकारी युद्धनौकांपैकी तिसरी असून त्याची रचना भारतीय नौदलाची अंतर्गत संस्था वॉरशिप डिझाईन ब्युरोने केली आहे.