चिनी निकेल प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी

चिनी निकेल प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी

इंडोनेशियातील दुर्घटनेत 12 ठार, 39 जखमी
वृत्तसंस्था/ जकार्ता
इंडोनेशियातील चिनी निकेल प्रकल्पात रविवारी झालेल्या स्फोटात 12 कामगार झाले असून 39 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकेल प्रकल्पातील भट्टीत दुऊस्तीचे काम सुरू असताना ही आग लागली. या आगीत प्रकल्पाचा बहुतांश भाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. ही दुर्घटना स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. मृतांमध्ये 7 इंडोनेशियन आणि 5 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.