‘विश्रुत चिट्स’ लिटल मास्टर लीगचे मुख्य पुरस्कर्ते

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 13 वर्षाखालील मुलांच्या विश्रुत चिट्स लिटल मास्टर लीगचे मुख्य पुरस्कर्ते म्हणून चंदन कुंदरनाड यांनी पुढाकार घेतला आहे सदर स्पर्धा युनियन जिमखाना मैदानावर 25 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अल्पावधीतच युवा उद्योजक म्हणून नावारूपास आलेले चंदन कुंदरनाड हे पीपल्स क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित, पीपल्स इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन व  विश्रुत चिट्स […]

‘विश्रुत चिट्स’ लिटल मास्टर लीगचे मुख्य पुरस्कर्ते

बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 13 वर्षाखालील मुलांच्या विश्रुत चिट्स लिटल मास्टर लीगचे मुख्य पुरस्कर्ते म्हणून चंदन कुंदरनाड यांनी पुढाकार घेतला आहे सदर स्पर्धा युनियन जिमखाना मैदानावर 25 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अल्पावधीतच युवा उद्योजक म्हणून नावारूपास आलेले चंदन कुंदरनाड हे पीपल्स क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित, पीपल्स इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशन व  विश्रुत चिट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांचे सीईओ व संस्थापक आहेत. सदर लिटल मास्टर लीग स्पर्धेत एकूण सहा संघांचा सहभाग असून स्पर्धा राऊंड रॉबिन लीग पद्धतीने होणार आहे. स्पर्धेत एकूण 18 सामने होणार असून सामने 25 षटकांचे होणार आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून या नवोदित खेळाडूंना पांढरा चेंडू व रंगीत पोशाखात क्रिकेट खेळण्याचा आनंद मिळणार आहे. जिमखाना मैदानावर एका कार्यक्रमात जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर यांच्या हस्ते चंदन पुंदरनाड यांचा खास सत्कार  करून गौरविण्यात आले.