…अखेर बसवण कुडची येथील तपासनाका हलविला

…अखेर बसवण कुडची येथील तपासनाका हलविला

तपासनाका अन्यत्र हलविल्याने नागरिकांतून समाधान
वार्ताहर /सांबरा
अखेर बसवण कुडची गावानजीकचा तपासनाका इतरत्र हलविण्यात आल्याने वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मंगळवारी 23 रोजीच्या ‘तऊण भारत’मधून ‘बसवण कुडची नजीकचा तपासनाका हलविण्याची मागणी’ या मथळ्याखाली सचित्र बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत मंगळवारी सायंकाळीच येथील तपासनाका इतरत्र हलविण्यात आला. येथील तपासनाक्याजवळ शनिवारी दुचाकी व टिप्परचा अपघात झाला होता. अपघातात सांबरा येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे येथील तपासनाका चर्चेत आला होता व चुकीच्या ठिकाणी असलेला तपासनाका इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी  जोर धरू लागली होती. याची दखल घेत मंगळवारी सायंकाळीच येथील तपासनाका अन्यत्र हलविल्याने वाहनचालक व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.