नेहा हिरेमठ हत्येच्या घटनेचा निषेध

नेहा हिरेमठ हत्येच्या घटनेचा निषेध

आरोपीला कठोर शिक्षेची मागणी : उचगाव ग्रामस्थांतर्फे पॅन्डल मोर्चा
वार्ताहर /उचगाव
नेहा हिरेमठ या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या गेल्या आठवड्यात हुबळी येथे झाली. समाजात अशा घटना पुन्हा होऊ नयेत, अशी कठोरात कठोर शिक्षा विद्यार्थिनीच्या खुन्याला मिळाली पाहिजेत. तसेच या प्रकरणाची अंमलबजावणी तातडीने होणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थिनी, युवती व महिलांना सुरक्षा मिळणे महत्त्वाचे आहे, असे मनोगत उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे यांनी व्यक्त केले. नेहा हिरेमठ या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची निर्घृण हत्या गेल्या आठवड्यात हुबळी येथे झाली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री 7 वाजता उचगाव ग्रामस्थ आणि ग्रा. पं.तर्फे पॅन्डल मोर्चा काढण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मथुरा तेरसे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी मथुरा तेरसे यांच्या हस्ते नेहा हिरेमठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दोन मिनिटे स्तब्धता पळून सर्वांच्यावतीने श्र्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर गावामध्ये सर्वांच्या उपस्थितीत पॅण्डल मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक उचगाव येथून या पॅन्डल मोर्चाची सुऊवात झाली. यावेळी या मोर्चामध्ये ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक, महिला, युवती व युवक यांनी सहभाग घेतला होता. पुन्हा सदर मोर्चा बस स्थानकावरती आल्यानंतर समारोप करण्यात आला. हिंदूंच्या मुली, महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना आता अगदी नजीक म्हणजेच हुबळीपर्यंत येऊन घडत आहेत. यासाठी आपल्या भागातील जनतेसह मुलींनी, महिलांनी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे असल्याचे निवृत्त फौजी व ग्रामपंचायत सदस्य गजानन नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी उचगाव पंचक्रोशी, माजी सैनिक संघटना यांच्यावतीनेही श्र्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रा. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, माजी अध्यक्ष संभाजी कदम, रामा कदम, सदस्य बंटी पावशे, यादो कांबळे, विनोद पावशे, बंडू पाटील, मनोहर कदम, अमर जाधव, मिथिल जाधव, शशिकांत जाधव, अशोक कलजी, उमाशंकर देसाई, राजू बांदिवडेकर, पवन देसाई, शरद जाधव, अनिल देसाई, भारती जाधव, रूपा गोंधळी, मल्लाप्पा कदम यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.