‘विक्की विद्या वो वाला वीडियो’ लवकरच

‘विक्की विद्या वो वाला वीडियो’ लवकरच

राजकुमार राव, तृप्ति डिमरी मुख्य भूमिकेत
राजकुमार राव आणि तृप्ति डिमरी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून येणार आहेत. हे दोघेही ‘विक्की विद्या का वो वाला वीडियो’ चित्रपटात दिसून येणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेसोबत पोस्टर सादर करण्यात आले आहे.
राजकुमार रावने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ‘रेट्रो जुन्या आठवणींच्या प्रवासाठी कंबर कसा, 11 ऑक्टोबर 2024 रोजी आम्ही येतोय, ‘विक्की विद्या का वो वाला वीडियो’मध्ये तुम्हाला रंजक प्रवासावर नेण्यासाठी उत्सुक आहे’ असे नमूद केले आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘97 टक्के कौटुंबिक’ असे नमूद आहे. चित्रपटाची कहाणी आणि दिग्दर्शन राज शांडिल्य यांचे आहे. तर संगीत सचिन आणि जिगर यांनी दिले आहे. चित्रपटात नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध तृप्ति डिमरी देखील दिसून येणार आहे.
राजकुमार सध्या ‘श्रीकांत’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. श्रीकांत एक बायोपिक आहे. तर मिस्टर अँड मिसेज माही एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. विक्की विद्या का वो वाला वीडियो एक कॉमेडी चित्रपट आहे.