वैशालीचा हंपीवर विजय, प्रज्ञानंदला पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था /स्टॅव्हेंजर, नॉर्वे भारताची महिला बुद्धिबळपटू आर. वैशालीने आपल्याच देशाच्या कोनेरू हंपीचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला विभागात अग्रस्थानी झेप घेतली. मात्र तिचा भाऊ आर. प्रज्ञानंदला पराभवाचा धक्का बसला. क्लासिकल टाईम कंट्रोल डावांत विजय मिळविल्यास तीन गुण दिले जातात, त्याचा लाभ घेत वैशालीने दुसऱ्या फेरीअखेर 4 गुण घेत पहिले स्थान मिळविले आहे. पहिल्या फेरीत […]

वैशालीचा हंपीवर विजय, प्रज्ञानंदला पराभवाचा धक्का

वृत्तसंस्था /स्टॅव्हेंजर, नॉर्वे
भारताची महिला बुद्धिबळपटू आर. वैशालीने आपल्याच देशाच्या कोनेरू हंपीचा पराभव करून नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला विभागात अग्रस्थानी झेप घेतली. मात्र तिचा भाऊ आर. प्रज्ञानंदला पराभवाचा धक्का बसला. क्लासिकल टाईम कंट्रोल डावांत विजय मिळविल्यास तीन गुण दिले जातात, त्याचा लाभ घेत वैशालीने दुसऱ्या फेरीअखेर 4 गुण घेत पहिले स्थान मिळविले आहे. पहिल्या फेरीत तिला जलद प्रकारात चीनच्या वेनजुन जू हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. पण त्याचा तिच्या स्थानावर फारसा परिणाम झाला नाही. भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बनलेली वैशाली आघाडीवर असून चीनच्या टिंगजी लेइ व वेनजुन जू तिच्या पाठोपाठ आहेत. युक्रेनच्या अॅना मुझीचुक व स्वीडनच्या पिया क्रॅमलिंग संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत. सहा खेळाडूंच्या सहभागाची ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात आहे. हंपी तळाच्या स्थानावर असून तिचे 1.5 गुण झाले आहेत.
प्रज्ञानंद पराभूत
पुरुष विभागात जागतिक अग्रमानांकित कार्लसनने अग्रस्थान मिळविले आहे. या फेरीतही आर्मागेडॉन पद्धतीनेच सामन्यांचे निकाल लागले. आर. प्रज्ञानंदला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन चीनच्या डिंग लिरेनकडून टायब्रेकरमध्ये पराभूत झाला.