अनंत अंबानी आणि राधिका यांच्या विवाहाचा मुहूर्त ठरला !

अनंत अंबानी आणि राधिका यांच्या विवाहाचा मुहूर्त ठरला !

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. शुक्रवार १२ जुलै रोजी दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. एएनआयने अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची लग्नपत्रिका शेअर करत या संबंधित वृत्त दिले आहे.
अनंत अबानी हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण अखेर ठरले आहे. या दोघांचा विवाह १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. हा विवाह पारंपारिक हिंदू वैदिक पद्धतीने होणार असल्याचे देखील वृत्तात म्हटले आहे.
Anant Ambani Radhika Wedding: ‘असा’ असेल ‘विवाह-सोहळा’ कार्यक्रम
शुक्रवार,१२ जुलै- मुख्य विवाह समारंभ (शुभ विवाह)
शनिवार,१३ जुलै- शुभ, दैवी आशीर्वाद कार्यक्रम
रविवार, १४ जुलै- मंगल उत्सव किंवा रिसेप्शन कार्यक्रम

Anant Ambani and Radhika’s Wedding to be held in Mumbai on 12th July at the Jio World Convention Centre in BKC. Wedding to be performed in accordance with the traditional Hindu Vedic way.
The main wedding ceremonies will start on Friday, 12th July with the auspicious Shubh… pic.twitter.com/YKnaAIAs7o
— ANI (@ANI) May 30, 2024

हे ही वाचा:

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : तीन खान थिरकले ‘नाटू- नाटू’ वर
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या सोहळ्यात ६५ शेफ बनवणार इंदौरी पदार्थ?
Anant Ambani Radhika Engagement: अनंत अंबानी-राधिकाचा आज साखरपुडा

 

Go to Source