दिलीप कोल्हापुरे फुटबॉल चषकाचे अनावरण
बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक मंडळ छत्रपती शिवाजी कॉलनी आयोजित कोल्हापुरे चषक निमंत्रितांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. शिवाजी कॉलनी येथे दिलीप कोल्हापुरे चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषक अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रणय शेट्टी, आनंद चव्हाण, नंदू मिरजकर, उद्योजक महेश फगरे, वाय. पी. नाईक, श्रीकांत फगरे, नितीन गोडसे, पवन कांबळे, सागर भोसले, मोहन पोटजाळे, यशोधर जैन, राकेश कांबळे, प्रशांत पवार, संतोष दळवी, विनायक धामणेकर, विक्रम कदम यांच्या उपस्थितीत चषकाचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत एकूण स्थानिक 16 संघानी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये एमव्हीएम, जी.जी. चिटणीस, कनक मेमोरियल, एम. व्ही. हेरवाडकर, ज्ञान प्रबोधिनी, मुक्तांगण, एनपीईटी, संत मीरा, केएलएस, ज्ञानमंदिर, के व्ही-2, गोमटेश, इस्लामिया, भरतेश, ओरिएंटल व सेंट झेवियर्स या संघांनी भाग घेतला आहे. शुक्रवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पहिला सामना केएलएस विरुद्ध ज्ञानमंदिर यांच्यात सकाळी 10.30 वाजता खेळविण्यात येईल. उद्घाटनादिवशी सहा सामने खेळविण्यात येणार आहेत. तरी सर्व संघांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी दिलीप कोल्हापुरे फुटबॉल चषकाचे अनावरण
दिलीप कोल्हापुरे फुटबॉल चषकाचे अनावरण
बेळगाव : छत्रपती शिवाजी युवक मंडळ छत्रपती शिवाजी कॉलनी आयोजित कोल्हापुरे चषक निमंत्रितांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या चषकांचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. शिवाजी कॉलनी येथे दिलीप कोल्हापुरे चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषक अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रणय शेट्टी, आनंद चव्हाण, नंदू मिरजकर, उद्योजक महेश फगरे, वाय. पी. नाईक, श्रीकांत फगरे, नितीन गोडसे, पवन कांबळे, सागर […]
