धारवाडजवळ अपघातात बेळगावचे दोघे ठार

गुड्स वाहनाची ट्रकला जोरदार धडक बेळगाव : धारवाड बायपासजवळील येरीकोप्पनजीक मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या ट्रक-गुड्स वाहन अपघातात बेळगाव येथील दोघा जणांचा मृत्यू झाला. धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. प्रशांत दुंडाप्पा संकेश्वर (वय 41 रा. जयनगर, हिंडलगा रोड), ट्रकचालक सुनील तुबाकी (वय 27 रा. सुतगट्टी, ता. बैलहौंगल) अशी त्या दुर्दैवींची नावे आहेत. […]

धारवाडजवळ अपघातात बेळगावचे दोघे ठार

गुड्स वाहनाची ट्रकला जोरदार धडक
बेळगाव : धारवाड बायपासजवळील येरीकोप्पनजीक मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या ट्रक-गुड्स वाहन अपघातात बेळगाव येथील दोघा जणांचा मृत्यू झाला. धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. प्रशांत दुंडाप्पा संकेश्वर (वय 41 रा. जयनगर, हिंडलगा रोड), ट्रकचालक सुनील तुबाकी (वय 27 रा. सुतगट्टी, ता. बैलहौंगल) अशी त्या दुर्दैवींची नावे आहेत. धारवाडहून बेळगावला येताना गुड्स वाहनाची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेला प्रशांत हा ट्रक मालक होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. सुनील हा ट्रकचालक होता. बुधवारी उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. धारवाड ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.