तापमानाचा पारा चढला

पणजी : गेले काही दिवस पाऊस नसल्याने राज्यात तापमानाचा पारा चढला असून उष्मा अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली असून पणजीत 34.4 तर मुरगावात 34 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस पाऊस न पडल्यास राज्यातील कमाल तापमान 35 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. खात्याने येत्या […]

तापमानाचा पारा चढला

पणजी : गेले काही दिवस पाऊस नसल्याने राज्यात तापमानाचा पारा चढला असून उष्मा अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. कमाल तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली असून पणजीत 34.4 तर मुरगावात 34 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवस पाऊस न पडल्यास राज्यातील कमाल तापमान 35 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. खात्याने येत्या 4 जूनपर्यंत तुरळक पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. वरील कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी 35 ते 40 किमी राहण्याची आणि 50 ते 55 कि.मी.पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन खात्यातर्फे करण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढील एक दोन दिवसांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो 4 ते 5 दिवसांत गोव्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.