भ्रष्टाचारावरील कारवाईमुळे विरोधी आघाडी अस्वस्थ!

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल वृत्तसंस्था/ मेरठ दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची महारॅली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रचारसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मी माझ्या देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी मोठी लढाई लढत आहे. त्यामुळेच आज बडे भ्रष्टाचारी तुऊंगात आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयातूनही जामीन मिळत नाही. त्यामुळेच विरोधी आघाडीचे नेते अस्वस्थ असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला. लोकसभा […]

भ्रष्टाचारावरील कारवाईमुळे विरोधी आघाडी अस्वस्थ!

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
वृत्तसंस्था/ मेरठ
दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीची महारॅली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रचारसभेतून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मी माझ्या देशाला भ्रष्टाचाऱ्यांपासून वाचवण्यासाठी मोठी लढाई लढत आहे. त्यामुळेच आज बडे भ्रष्टाचारी तुऊंगात आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयातूनही जामीन मिळत नाही. त्यामुळेच विरोधी आघाडीचे नेते अस्वस्थ असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला.
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर मेरठ येथे आयोजित आपल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भ्रष्टाचारावरील कारवाईमुळे काही लोक घाबरले आहेत. भ्रष्टाचार हटाव हाच मोदींचा मंत्र आहे. मात्र, विरोधक भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या लोकांनी एकत्रितपणे ‘इंडिया’ आघाडी उभी केली. त्यांना वाटते की मोदी घाबरतील, पण माझ्यासाठी देशवासीय हाच परिवार असून जनतेला  न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मेरठ ही क्रांतिकारकांची भूमी आहे, तिच्यावर बाबा आघडनाथांचा आशीर्वाद आहे.. या भूमीने चरणसिंगसारखे रत्न दिले आहे. त्यांना भारतरत्न देणारे आमचे सरकार भाग्यवान आहे. 2024 च्या निवडणुकीचा प्रचार येथून सुरू होत आहे. ही निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नाही तर विकसित भारत घडविण्यासाठी आहे. 2024 च्या निवडणुका भारताला जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवतील. भारत जगातील 11 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असताना लोक नाराज होते. मी हमी देतो की जेव्हा भारत अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. या आर्थिक सुधारामुळे केवळ गरिबी दूर होणार नाही, तर प्रत्येक वर्ग भारताला नवी ऊर्जा देईल, असे प्रतिपादनही पंतप्रधानांनी केले.
‘4 जून… 400 पार’
‘4 जून 400 पार, तिसऱ्यांदा मोदी सरकार’ अशी हाक देत पंतप्रधानांनी रालोआ निश्चितपणे 400 चा आकडा पार करेल, असा दावा केला. संपूर्ण जग भारताकडे आत्मविश्वासाने पाहत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमचे सरकार तिसऱ्या टर्मच्या तयारीत पूर्णपणे गुंतले आहे. आम्ही पुढील पाच वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत. पहिल्या 100 दिवसांत काय घडणार आहे याची ब्लू प्रिंट तयार केली जात आहे. 10 वर्षात विकासचा टेलर पाहिला, अजून खूप काही व्हायचे आहे. देशातील तऊणांना चिंता करावी लागू नये यासाठीही सरकार काम करत असल्याचे मोदी पुढे म्हणाले.