मनपा आयुक्तांनी केली महापौरांशी चर्चा

स्थायी समितींची निवड-बैठक घेण्याबाबत हालचाली बेळगाव : लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील कामकाजाला चालना मिळणार आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त पी. एन. लोकेश हे महापौर सविता कांबळे यांच्या कक्षामध्ये गुरुवारी दाखल झाले होते. यावेळी महापौरांनी व इतर नगरसेवकांनी काही विषयांवर चर्चा केली. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे महापालिकेतील बैठका पूर्णपणे थांबविण्यात आल्या. याचबरोबर कोणताही निर्णय घेणे […]

मनपा आयुक्तांनी केली महापौरांशी चर्चा

स्थायी समितींची निवड-बैठक घेण्याबाबत हालचाली
बेळगाव : लोकसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील कामकाजाला चालना मिळणार आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त पी. एन. लोकेश हे महापौर सविता कांबळे यांच्या कक्षामध्ये गुरुवारी दाखल झाले होते. यावेळी महापौरांनी व इतर नगरसेवकांनी काही विषयांवर चर्चा केली. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे महापालिकेतील बैठका पूर्णपणे थांबविण्यात आल्या. याचबरोबर कोणताही निर्णय घेणे अशक्य झाले होते. त्यामुळे लवकरच शहरातील विविध समस्यांबाबत, तसेच जनतेच्या कामांबाबत पाऊल उचलण्याचे ठरविण्यात आले आहे. महापौरांच्या कक्षामध्ये तब्बल एक तासांहून अधिकवेळ चर्चा झाली आहे. स्थायी समितीची निवड, तसेच सर्वसाधारण बैठक घेण्याबाबतही चर्चा झाली असून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सभागृह अस्तित्वात आल्यानंतर विधानसभा निवडणूक, त्यानंतर आता लोकसभा निवडणूक झाली. यामुळे बरेच महिने आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले होते. आचारसंहितेमध्ये कोणताही निर्णय घेणे अशक्य झाले. परिणामी शहराचा विकास व समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले. गुरुवारी बराच उशीर चर्चा झाली असून आता मान्सूनचे आगमन होणार असून पूर निवारण व इतर समस्या सोडविण्याबाबत चर्चा झाली.