लग्नसराईत सोन्याची उच्चांकी दरवाढ!
सध्या महागाई वाढत चालली आहे. वाढत्या महागाई मुळे सामान्य माणसाला वावरणे कठीण होत आहे. आता लग्न सराईत सोन्याच्या किमतीत विलक्षण वाढ झाली आहे. आता सोन्याने 7 हजार प्रतिग्रॅम चे दर गाठले आहे. ऐन लग्नसराईत सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सर्वांची दमछाक होत आहे. सोन्याचा मोह सर्वांनाच असतो.
विशेष करून महिलांना सोन्याच्या दागिन्यांची विशेष आवड असते. लग्नात वधू वरांना सोन्याचे दागिने दिले जातात. पण सध्या सोनं 7 हजार प्रति ग्राम झाले आहे त्यामुळे वधू आणि वरपक्षाला सोनं घेणं जड होत आहे. सध्या सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे लोक जेमतेमच सोन्याची खरेदी करत आहे. ऐन लग्न सराईत सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी कमी आहे.
Edited by – Priya Dixit