के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील सहभागावरून बीआरएस नेत्या के. कविता यांना ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) अटक केली होती. त्यानंतर त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली. आज (दि.१) त्यांच्या जामीन याचिकेवर न्यायालयात थोक्यात सुनावणी झाली. दरम्यान के.कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने गुरूवार ४ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे, या सदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (K Kavitha)
बीआरएस नेत्या के.कविता यांनी अंतरिम किंवा नियमित जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, न्यायाधीशांनी या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली आहे. तोपर्यंक के.कविता यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना तुम्हाला कोणता जामीन हवा आहे हे ठरवण्यास सांगितले आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी गुरूवारी ४ एप्रिल रोजी होणार असल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले. (K Kavitha)
के. कविता यांना कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यातील सहभागाबद्दल अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 15 मार्च रोजी अटक केली होती. ईडीने त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानावर दिवसभर छापे टाकल्यानंतर के.कविता यांना ताब्यात घेतले होते. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात त्यांना हजर केले असता न्यायालयाने कविता यांना मंगळवार ९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती. दरम्यान त्यांनी सुटकेसाठी जामीन अर्ज दाखल केला होता. यावर आज सुनावणी झाली. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. (K Kavitha)
Rouse Avenue Court adjourns the arguments on bail of K Kavitha on April 4 after hearing initial submissions.
The court asks senior advocate Abhishek Manu Singhvi to decide whether he wants to argue on the interim or final bail
— ANI (@ANI) April 1, 2024
हे ही वाचा:
K Kavitha News: ‘हे मनी लॉन्ड्रिंग नाही तर राजकीय लॉन्ड्रिंग’; के. कविता यांचा सत्ताधारी, ईडीवर हल्लाबोल
K Kavitha: के. कविता यांना दणका; के.कविता यांच्या अटकेविरोधी याचिकेवरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार
K Kavitha in Custody: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात के. कविता यांना ७ दिवस ईडी कोठडी
The post के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली appeared first on Bharat Live News Media.