न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियाचा जोरदार सराव
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला 2 जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेआधी सराव सामने खेळवले जात असून टीम इंडियाचा सराव सामना 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भारतीय संघाचा 1 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ कौंटी क्रिकेट स्टेडियमवर सराव सामना होणार आहे. याच स्टेडियमवर टीम इंडियाचा सराव सुरु असून बुधवारी कर्णधार रोहित शर्मासह सर्वच खेळाडू फुटबॉल व जॉगिंगचा सराव केला. विशेष म्हणजे, टीम इंडियाचे ग्रुपमधील चार पैकी तीन सामने याच स्टेडियमवर होणार आहेत. यामुळे स्टेडियमच्या जवळच टीम इंडियाचा मुक्काम आहे. सध्या तरी खेळाडू स्थानिक हवामानाशी व टाईम झोनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यामुळे उर्वरित दोन दिवसात जादा सरावावर भर देणार असल्याची माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली.
विश्वचषकासाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
Home महत्वाची बातमी न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियाचा जोरदार सराव
न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियाचा जोरदार सराव
वृत्तसंस्था /न्यूयॉर्क आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेला 2 जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये सुरुवात होत आहे. स्पर्धेआधी सराव सामने खेळवले जात असून टीम इंडियाचा सराव सामना 1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. भारतीय संघातील सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफ न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या सरावाचे फोटो सोशल […]