रक्ताअभावी थांबलेल्या शस्त्रक्रिया पूर्ण !
युवा रक्तदाता संघटना ठरली हक्काची ‘ब्लड बँक’
ओटवणे | प्रतिनिधी
रक्ताअभावी शस्त्रक्रिया थांबलेली असताना युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदात्यांनी रक्तदान करीत बुधवारी दोन रुग्णांचे प्राण वाचवले. त्यामुळे रूग्णांसाठी हक्काची ‘ब्लड बँक’ ठरलेल्या सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेने पुन्हा आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यामुळे रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेचे रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ए आणि बी पॉझिटिव्ह’ या रक्त गटाची आवश्यकता होती. मात्र रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदली रक्ताची मागणी रक्तपेढी अधिकारी यांच्याकडून होत होती. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाता नसेल तर रक्त पिशवी नाकारण्यात येत होती. त्यामुळे रक्ताअभावी शस्त्रक्रीया थांबलेल्या होत्या. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर देव्या सुर्याजी यांनी आपल्या संघटनेच्या प्रथमेश सुकी, गुरूप्रसाद गवळी, शिवम सावंत, निमिष पटेकर, सागर मुंज, गोपाळ गोवेकर, सुदेश नेवगी या रक्तदात्यांना तातडीने रक्तपेढीत पाठवले. या सर्वांनी रक्तदान केल्यामुळे रक्ता अभावी थांबलेल्या शस्त्रक्रियां पूर्ण झाल्या. त्यामुळे तात्काळ रक्तपुरवठा केल्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व रक्तदात्यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले. गेली अनेक वर्ष युवा रक्तदाता संघटना रक्तदान चळवळीत कार्यरत आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह, जिल्हा रुग्णालय ओरोस व गोवा मणीपाल रूग्णालय येथे उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या मदतीला युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदात्यांनी धावून जात धावून रूग्णांना जीवनदान दिले आहे. दरम्यान ,अनेक ठिकाणी संघटनेचे सदस्य रक्तदाते सामाजिक भान ठेवून अपघातग्रस्त तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनून रक्तदान करत आहेत. यापुढेही रक्तदानासाठी संघटना अशाच पद्धतीने कार्यरत राहील. या लाल क्रांतीमध्ये अनेकांनी सामील होऊन रक्तदान करावे आणि रूग्णांचे जीव वाचवावेत असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी रक्ताअभावी थांबलेल्या शस्त्रक्रिया पूर्ण !
रक्ताअभावी थांबलेल्या शस्त्रक्रिया पूर्ण !
युवा रक्तदाता संघटना ठरली हक्काची ‘ब्लड बँक’ ओटवणे | प्रतिनिधी रक्ताअभावी शस्त्रक्रिया थांबलेली असताना युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदात्यांनी रक्तदान करीत बुधवारी दोन रुग्णांचे प्राण वाचवले. त्यामुळे रूग्णांसाठी हक्काची ‘ब्लड बँक’ ठरलेल्या सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेने पुन्हा आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यामुळे रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेचे रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार […]