बॉन बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी विजेती

वृत्तसंस्था/ बॉन विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या फ्युचर सिरिजमधील येथे शनिवारी झालेल्या बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची नवोदीत युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात तिने चीन तैपेईच्या यु चा पराभव केला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वी शर्माने वेंग यु चा 30 मिनिटांच्या कालावधीत 21-19, 22-20 अशा गेम्समध्ये फडशा पाडला. पंजाबच्या 15 वर्षीय तन्वी […]

बॉन बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी विजेती

वृत्तसंस्था/ बॉन
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या फ्युचर सिरिजमधील येथे शनिवारी झालेल्या बॉन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची नवोदीत युवा बॅडमिंटनपटू तन्वी शर्माने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात तिने चीन तैपेईच्या यु चा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तन्वी शर्माने वेंग यु चा 30 मिनिटांच्या कालावधीत 21-19, 22-20 अशा गेम्समध्ये फडशा पाडला. पंजाबच्या 15 वर्षीय तन्वी शर्माने मलेशियात झालेल्या वरिष्ठांच्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. बॉन स्पर्धेत पुरुष दुहेरीत हॉलंडच्या नोव्हा हेस डियॉन व विजलेख यांनी भारताच्या प्रकाश राज व गौस शेख यांचा 21-19, 21-16 असा पराभव करत विजेतेपद मिळविले. महिलांच्या दुहेरीमध्ये तुर्कीच्या बेकतास व झेरा इरडेम यांनी भारताच्या श्रीनिधी नारायणन व राधिका शर्मा यांचा 21-17, 21-10 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले.