मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पोलीस आयुक्तांना मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या घटनांवर आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी रस्त्यांवर आणि चौकात वाहनचालकांची तपासणी करून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब आणि बारवर कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेसह पोलिस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाईमद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दंड आकारण्यात यावा. तसेच नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर (रिपीट ऑफेंडर) कडक कारवाई करण्यात यावी. अशा वाहनचालकांचे परवाने रद्द करावेत. मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब, बार आणि रेस्टॉरंटची नियमित तपासणी करावी.नियमित तपासणीपब, बार, रेस्टॉरंट उघडण्याच्या वेळा, ध्वनी प्रदूषण नियम, आवश्यक परवाने याबाबत नियमित तपासणी केली पाहिजे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बार, पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई करावी, त्यांचे परवाने रद्द करावेत. मद्यपान करून वाहन चालवण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत. हेही वाचाHit-And-Run : वरळीत वेगवान बीएमडब्ल्यूने महिलेला उडवले
“तो आमच्या पक्षाचा असला तरी कारवाई करू”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ बंद करण्यासाठी कठोर कारवाई करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे