रस्त्यावरील खड्डे बुजवून जपली सामाजिक बांधिलकी
उचगावच्या गणेश दूध संकलन केंद्राचा उपक्रम कौतुकास्पद : दैनिक ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ वृत्ताची दखल
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बाची मार्गावरील उचगावनजीक असलेल्या बेळगुंदी फाट्यावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. या संदर्भातील वृत्त ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल या फाट्यानजिक असलेल्या गणेश दूध संकलन केंद्राने घेऊन स्वखर्चाने सदर भागातील सर्व खड्डे, खडी-चिपिंग आणून बुजविले आणि सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून याबद्दल प्रवासीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ने सदर वृत्त फोटोसह प्रसिद्ध करून खड्डे आणि रस्त्याची दुर्दशा निदर्शनाला आणून दिल्याबद्दल ‘तऊण भारत’चेही आभार मानण्यात येत आहेत.
तर सार्वजनिक बांधकाम खात्याला मात्र अद्याप याची जाणीव होत नसल्याने प्रवासी वर्गातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील बेळगाव-बाची या कर्नाटक हद्दीतील अनेक ठिकाणी या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली असून, मोठमोठे खड्डे आणि सध्या खड्ड्यात साचलेले पाणी यामुळे प्रवासी वर्गाला वाहने चालवताना या खड्ड्यांचा आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठमोठे अपघात सातत्याने घडत आहेत.
या रस्त्याची दुर्दशा पाहता सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे बुजविणे अतिशय गरजेचे आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खाते पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हिंडलगा, सुळगा, उचगाव, तुरमुरी, बाची आणि कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवरील अनेक ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांची मालिकाच दिसून येते. रात्रीच्या अंधारातून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन दुचाकी वाहने व चार चाकी वाहने चालवणे म्हणजे मुश्किल झालेले आहे.
या संदर्भातील वृत्त छायाचित्रांसह प्रसिद्ध करून आवाज उठविण्यात आला होता. याची दखल घेऊन या गणेश दूध संकलन संस्थेने बेळगुंदी फाट्याच्या भागातील खड्डे स्वखर्चातून खडी चीपिंग ट्रॅक्टरद्वारे आणून बुजवली. यासाठी या दूध संकलन केंद्राचे मालक प्रवीण देसाई, मोतीराम देसाई, सुधाकर करटे यांनी विशेष परिश्र्रम घेतले. यावेळी अमोल बेळगावकर, सुनील बामणे यासह काही कार्यकर्त्यांनी आणलेली खडी, चीपिंग, फावडी, बुट्ट्या घेऊन सगळे खड्डे बुजविण्यात आले. आणि सर्वांनीच सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी रस्त्यावरील खड्डे बुजवून जपली सामाजिक बांधिलकी
रस्त्यावरील खड्डे बुजवून जपली सामाजिक बांधिलकी
उचगावच्या गणेश दूध संकलन केंद्राचा उपक्रम कौतुकास्पद : दैनिक ‘तरुण भारत’ वृत्ताची दखल वार्ताहर /उचगाव बेळगाव-बाची मार्गावरील उचगावनजीक असलेल्या बेळगुंदी फाट्यावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. या संदर्भातील वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध होताच याची दखल या फाट्यानजिक असलेल्या गणेश दूध संकलन केंद्राने घेऊन स्वखर्चाने सदर भागातील सर्व खड्डे, खडी-चिपिंग आणून बुजविले आणि सामाजिक बांधिलकी जपली. […]