डेंग्यू नियंत्रणासाठी खबरदारीच्या उपाययोजना करा

डेंग्यू नियंत्रणासाठी खबरदारीच्या उपाययोजना करा

मंत्री प्रियांक खर्गे यांची ग्रामपंचायतींना सूचना : राज्यात झिका विषाणूचाही शिरकाव
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात डेंग्यूच्या ऊग्णांची नोंद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायतींनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना ग्रामविकास आणि पंचायत राज आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्मया, उघडी टाकी व सार्वजनिक शौचालयातील पाणी साठविण्याच्या टाक्मया आठवडाभरात स्वच्छ करण्याची कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासह डेंग्यूच्या ऊग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असा आदेशही त्यांनी दिला आहे.
घरे, दुकाने, हॉटेल्स, व्यापारी संकुले, सार्वजनिक ठिकाणे आणि रिकाम्या जागांमध्ये जास्त काळ पाणी साचू नये यासाठी उपाययोजना कराव्यात. याचबरोबर परिसर स्वच्छ ठेवावा, पावसाच्या पाण्याची त्वरित आणि सुरक्षित विल्हेवाट लावावी. अंगणवाड्यांचे छत, शाळा-महाविद्यालये, निवासी शाळा आणि आवारात पावसाचे पाणी साचू नये यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असा सल्लाही मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिला आहे.
डेंग्यूमुळे सरकारची उडाली झोप
राज्यात डेंग्यूच्या ऊग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत सात हजारांहून अधिक ऊग्ण आढळून आल्याने राज्य सरकारची झोप उडाली आहे. यामध्येच झिका संसर्गामुळे राज्यातील पहिला मृत्यू शिमोगामध्ये झाला असल्याने आणखीन चिंता वाढली आहे. राज्यात डेंग्यूने थैमान घातले असतानाच झिका विषाणूचा शिरकाव झाला आहे. शिमोग्यात 74 वषीय व्यक्ती झिका विषाणूचा पहिला बळी ठरला आहे. दरम्यान, रविवारी अंजनापूर येथील 11 वषीय गगनचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर आता झिकामुळे 74 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या संसर्गामुळे आणखी चिंता निर्माण झाली आहे.
24 तासांत डेंग्यूचे 175 रुग्ण
गेल्या 24 तासांत राज्यात