अॅल्ड्रीन, अंकिताला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

अॅल्ड्रीन, अंकिताला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
26 जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने यापूर्वीच 28 सदस्यांचा संघ जाहीर केला होता. पण या संघात आता भारताची धावपटू अंकिता ध्यानी आणि जेस्वीन अॅल्ड्रीन यांचा समावेश करण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक पात्र फेरी स्पर्धेत जेस्वीन अॅल्ड्रीन आणि अंकिता ध्यानी यांनी विश्व मानांकन कोट्यातून स्थान मिळविले आहे. महिलांच्या लांब उडी प्रकारात जेस्वीन अॅल्ड्रीन तर महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत अंकिता ध्यानी भारताचे प्रतिनिधीत्व करतील. भारताचा पुरुष अॅथलिट एम. श्रीशंकरने दुखापती समस्येमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही. श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत 8.27 मी. चे अंतर नोंदवित ऑलिम्पिक पात्रतेची मर्यादा पार करत थेट प्रवेश मिळविला होता. पण दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागत आहे. 30 सदस्यांचा भारतीय ऑलिम्पिक चमू सोमवारी पोलंडला प्रयाण करणार आहे. पोलंडमध्ये काही दिवसासाठी या संघाला बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील ट्रॅक आणि फिल्ड क्रीडा प्रकाराला 1 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.