म्हैसूरमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक

प्रतिनिधी/ बेंगळूर इस्त्रायली दूतावास बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा कट रचल्याप्रकरणी फरार असलेल्या संशयित दहशतवाद्याला एनआयएच्या पथकाने बुधवारी अटक केली. नुरूद्दीन उर्फ रफी असे संशयिताचे नाव आहे. 2014 मध्ये चेन्नईतील युएस दूतावास आणि बेंगळूरमधील इस्त्रायल दूतावासात स्फोट घडविण्याचा कट रचण्यात  आला होता. या प्रकरणात फरार असलेल्या नुरूद्दीन याला एनआयएने म्हैसूरच्या राजीवनगर येथे अटक केली. त्याच्याजवळून ड्रोन, मोबाईल, […]

म्हैसूरमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक

प्रतिनिधी/ बेंगळूर
इस्त्रायली दूतावास बॉम्बस्फोटाने उडवून देण्याचा कट रचल्याप्रकरणी फरार असलेल्या संशयित दहशतवाद्याला एनआयएच्या पथकाने बुधवारी अटक केली. नुरूद्दीन उर्फ रफी असे संशयिताचे नाव आहे. 2014 मध्ये चेन्नईतील युएस दूतावास आणि बेंगळूरमधील इस्त्रायल दूतावासात स्फोट घडविण्याचा कट रचण्यात  आला होता. या प्रकरणात फरार असलेल्या नुरूद्दीन याला एनआयएने म्हैसूरच्या राजीवनगर येथे अटक केली. त्याच्याजवळून ड्रोन, मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. कोलंबो येथे असणाऱ्या पाकिस्तानी उच्चयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्याशी त्याचा संपर्क होता. पाकचा नागरीक अमीर झुबेर सिद्दीकी याच्या इशाऱ्यावरून नुरुद्दीन काम करत होता. तो पाकिस्तानी हेरांना मदत करत असल्याचा संशय आहे.