विश्व पॅरा स्पर्धेसाठी सुधीर माळगी जर्मनीला रवाना

बेळगाव : जर्मनी येथे होणाऱ्या आयडीएम बर्लिन विश्व पॅरा जलतरण स्पर्धेसाठी बेळगावचा दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगी हा भारताचे प्रतिनिधित्व करताना भारतीय पॅरा जलतरण संघातून जर्मनीला रवाना झाला आहे. बेळगावच्या मजगाव येथील गरीब घराण्यातील श्रीधर एन माळगी 24 वर्ष जलतरणपटू विविध गटात राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवून भारतीय प्यारा संघटनेचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या या कामगिरीची […]

विश्व पॅरा स्पर्धेसाठी सुधीर माळगी जर्मनीला रवाना

बेळगाव : जर्मनी येथे होणाऱ्या आयडीएम बर्लिन विश्व पॅरा जलतरण स्पर्धेसाठी बेळगावचा दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगी हा भारताचे प्रतिनिधित्व करताना भारतीय पॅरा जलतरण संघातून जर्मनीला रवाना झाला आहे. बेळगावच्या मजगाव येथील गरीब घराण्यातील श्रीधर एन माळगी 24 वर्ष जलतरणपटू विविध गटात राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवून भारतीय प्यारा संघटनेचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन जर्मनी येथे होण्राया आयडियम बर्लिन विश्व प्यारा जलतरण वर्ल्ड सिरीज स्पर्धेसाठी बेंगलोर येथील केंपेगवडा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट वरून जर्मनीला रवाना झाला आहे. तो या स्पर्धेत 50 मीटर फाईव्ह स्टाईल, 200 व 400 मीटर वैयक्तिक मि मिडले या प्रकारात भाग घेणार आहे. या स्पर्धेसाठी श्रीधर ने बेळगावच्या आंतरराष्ट्रीय त्याच्या जेएमसी तलावात व बेंगलोर येथे कठीण सराव करून या स्पर्धेची संपूर्ण तयारी त्यांनी केली आहे. श्रीधरणी यापूर्वी 19 आंतरराष्ट्रीय पदके तर राष्ट्रीय पदके जलतरण क्षेत्रात पटकावली आहेत त्यामध्ये 36 सुवर्ण, 11 रोप्य, व चार कांस्यपदक पटकाविली आहेत. त्याने बटरफ्लाय, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, व फ्रीस्टाइल प्रकारात वरील पथके पटकावले आहेत. श्रीधर माळगीला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी अक्षय शेरीगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे