महांतेशनगर येथे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन महिलांना अटक

महांतेशनगर येथे संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन महिलांना अटक

बेळगाव : महांतेशनगर परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन महिलांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. महाबुबी बाशा शेख (वय 25), मोदीनबी सद्दाम सय्यद (वय 30, दोघीही राहणार गोकुळ गल्ली, जुने गांधीनगर) अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवार दि. 31 मे रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास या दोघी महांतेशनगर येथील चंद्रमौळी कॉलनी परिसरात संशयास्पदरित्या फिरत होत्या. नव्याने सुरू असलेल्या बांधकामांवर सेंट्रिंग प्लेट उचलण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी संशयावरून या दोघींना ताब्यात घेतले आहे. त्यांना विशेष दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यांच्या आदेशावरून या महिलांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. महाबुबी व मोदीनबी यांना यापूर्वी स्क्रॅप चोरीच्या आरोपाखाली अटक झाली होती.