कर्ज अनियमिततेमुळे एनबीएफसी विरुद्ध कठोर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने उचलले पाऊल : दोन कंपन्यांवर कारवाई नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय) ने कर्ज देण्याच्या पद्धतींमध्ये अनियमितता केल्याबद्दल एनबीएफसी कंपन्यांविरुद्ध (बिगर बँकिंग कंपन्या)कठोर कारवाई केली आहे. पॉलिटेक्स इंडिया आणि स्टार फिनसर्व्ह इंडिया या दोन बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. आरबीआयने या एनबीएफसीचे परवानेही रद्द केले असल्याची माहिती आहे. पॉलिटेक्स इंडियाचे […]

कर्ज अनियमिततेमुळे एनबीएफसी विरुद्ध कठोर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने उचलले पाऊल : दोन कंपन्यांवर कारवाई
नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय) ने कर्ज देण्याच्या पद्धतींमध्ये अनियमितता केल्याबद्दल एनबीएफसी कंपन्यांविरुद्ध (बिगर बँकिंग कंपन्या)कठोर कारवाई केली आहे. पॉलिटेक्स इंडिया आणि स्टार फिनसर्व्ह इंडिया या दोन बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. आरबीआयने या एनबीएफसीचे परवानेही रद्द केले असल्याची माहिती आहे. पॉलिटेक्स इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. याशिवाय स्टार फिनसर्व्ह इंडियाचे हैदराबाद येथे कार्यालय आहे.
परवाना का रद्द केला?
पॉलिटेक्स इंडिया इतर सेवांचे आउटसोर्सिंग देखील करते जसे की कर्ज वसुली, क्रेडिट असेसमेंट, केवायसी पडताळणी, वितरण, तसेच कर्जदारांच्या तक्रारी ऐकणे, याबाबतीत नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे परवाना रद्द करण्यात आला. आरबीआयने दोन्ही एनबीएफसीचे परवाने रद्द करण्याची कारणे देखील दिली आहेत. स्टार फिनसर्व्हने कर्ज मंजूरी, कर्ज मूल्यांकन, केवायसी पडताळणी यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित सेवा आउटसोर्सिंगद्वारे डिजिटल कर्जामध्ये वित्तीय सेवांच्या आउटसोर्सिंगमध्ये अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे.
इतकेच नाही तर आरबीआयने स्टार फिनसर्व्हच्या नियमांच्या उल्लंघनाबाबत पुढे माहिती दिली आहे की त्यांनी ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांशी संबंधित डेटा गोपनीयतेसह ग्राहक सुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले आहे.