सुमित नागल दुसऱ्या फेरीत

सुमित नागल दुसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जर्मनीत चालु असलेल्या एटीपी चॅलेंजर पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा टॉप सिडेड टेनिसपटू सुमित नागलने एकेरीत विजयी सलामी देताना ब्राझिलच्या अल्वेसचा पराभव केला.
या स्पर्धेत मानांकनात दुसरे स्थान मिळविणाऱ्या सुमित नागलने पहिल्या फेरीतील सामन्यात ब्राझिलच्या फिलीपी अल्वेसचा 6-1, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. नागलचा दुसऱ्या फेरीतील सामना अर्जेंटिनाच्या कॅचिनशी होणार आहे. सुमित नागलने पॅरिस ऑलिंपिकसाठी आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे. सध्या सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत नागलला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता.