शेअर बाजार पुन्हा नव्या उंचीवर
सेन्सेक्स 621 अंकांनी मजबूत : भारती एअरटेल, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट तेजीत
मुंबई :
भारतीय शेअर बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचल्याचे दिसून आले. यासोबतच सलग तिसऱ्या दिवशी तेजीची नोंद राहिली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, मुख्य बँकिंग समभाग व मारुती सुझुकी, आयटीसी आदी कंपन्यांच्या समभागांमध्ये मजबूत अशी विक्री झाली आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 620.73 अंकांनी वधारुन 0.80 टक्क्यांसोबत निर्देशांक 78,674.25 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 147.50 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 23,868.80 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 18 समभाग हे वधारुन बंद झाले. यासह रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा, अदानी पोर्ट्स यांचे समभाग तेजीत पहिल्या पाचमध्ये राहिले आहेत. यासह अॅक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, कोटक बँक, नेस्ले, लार्सन अॅण्ड टुब्रो, एशियन पेन्ट्स, टीसीएस, स्टेट बँक आणि आयटीसी यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले.
अन्य कंपन्यांमधील 30 समभागांमधील 12 समभाग हे प्रभावीत झाले. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टाटा स्टील, टेक महिंद्रा, जेएसडब्लू आणि टायटन यांचे समभाग हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. यासह एचडीएफसी बँक, एचसीएल टेक, टाटा मोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प आणि इन्फोसिस यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक प्रभाव
जागतिक बाजारांमध्ये आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे वधारले आहेत. तसेच युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत मिळता जुळता कल राहिला होता. तसेच जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.80 टक्क्यांनी वधारुन 85.69 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.
Home महत्वाची बातमी शेअर बाजार पुन्हा नव्या उंचीवर
शेअर बाजार पुन्हा नव्या उंचीवर
सेन्सेक्स 621 अंकांनी मजबूत : भारती एअरटेल, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट तेजीत मुंबई : भारतीय शेअर बाजारात चालू आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी पुन्हा एकदा नव्या उंचीवर पोहोचल्याचे दिसून आले. यासोबतच सलग तिसऱ्या दिवशी तेजीची नोंद राहिली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्राटेक सिमेंट, मुख्य बँकिंग समभाग व मारुती सुझुकी, आयटीसी […]