पश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा लागू, लोकल फेऱ्याही रद्द

पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चगेट ते विरार-डहाणू रोडवरील प्रवाशांना प्रचंड विलंबाला सामोरे जावे लागत आहे. यातच सोमवारी 40 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली. सहाव्या मार्गाच्या जोडणीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने ताशी 20 किमीची वेगमर्यादा लागू केली आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर ही वेगमर्यादा असल्याने प्रवाशांना विलंबयातना सहन करतच प्रवास करावा लागणार आहे. मालाड स्थानकाच्या पूर्वेकडे जागा उपलब्ध नसल्याने स्थानकाच्या पश्चिमेकडे सहावी मार्गिका उभारण्यात आली आहे. याची जोडणी अन्य पाच मार्गिकांना देण्यासाठी रूळ तोडणी, सहावा मार्ग जोडून पुन्हा रुळांची जोडणी, अशी कामे सध्या सुरू आहेत. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत होत्या.रेल्वेकडून 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या मध्यरात्री 10 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीतील कामे पूर्ण झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव 20 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. ब्लॉकनंतर पहिल्या दिवशी 20 किमी आणि त्यानंतर हळूहळू ४५ किमी अशी वेगमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे. येत्या शनिवारपर्यंत वेगमर्यादा काढण्यात येईल. सध्या विरारकडे जाणाऱ्या धीम्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर दर आठवड्याला एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर संबंधित मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. सर्व वेगमर्यादा एका आठवड्यासाठी असणार आहेत.ब्लॉक कालावधीत विरारकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील काम यशस्वीपणे पूर्ण झाले असून, स्थानकात नवे फलाटही उभारण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि एसएजी दर्जाच्या अधिकारी समितीच्या संयुक्त मंजुरीनंतर नव्या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आगामी शनिवार-रविवारी 10 तासांचे एकूण चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 पर्यंत ब्लॉकवेळेतील कामे सुरू राहणार आहेत. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.वेगमर्यादा अशी… तारीख : 7-8 सप्टेंबर मार्ग : चर्चगेट जाणारा धीमा वेगमर्यादा समाप्त : 14 सप्टेंबर तारीख : 21-22 सप्टेंबर मार्ग : विरारला जाणारा जलद वेगमर्यादा समाप्त : 28 सप्टेंबर तारीख : 28-29 सप्टेंबर मार्ग : चर्चगेटकडे जाणारा जलद वेगमर्यादा समाप्त : 5 ऑक्टोबर तारीख : 5-6 ऑक्टोबर मार्ग : पाचवा वेगमर्यादा समाप्त : 12 ऑक्टोबरहेही वाचा जीवघेणा लोकल प्रवास! 15 वर्षांत 52,348 प्रवाशांचा मृत्यूपश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर वेगमर्यादा लागू, लोकल फेऱ्याही रद्द

पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चगेट ते विरार-डहाणू रोडवरील प्रवाशांना प्रचंड विलंबाला सामोरे जावे लागत आहे. यातच सोमवारी 40 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने त्यांच्या त्रासात अधिकच भर पडली.सहाव्या मार्गाच्या जोडणीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने ताशी 20 किमीची वेगमर्यादा लागू केली आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर ही वेगमर्यादा असल्याने प्रवाशांना विलंबयातना सहन करतच प्रवास करावा लागणार आहे.मालाड स्थानकाच्या पूर्वेकडे जागा उपलब्ध नसल्याने स्थानकाच्या पश्चिमेकडे सहावी मार्गिका उभारण्यात आली आहे. याची जोडणी अन्य पाच मार्गिकांना देण्यासाठी रूळ तोडणी, सहावा मार्ग जोडून पुन्हा रुळांची जोडणी, अशी कामे सध्या सुरू आहेत. यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या 20 ते 25 मिनिटे विलंबाने धावत होत्या.
रेल्वेकडून 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या मध्यरात्री 10 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या कालावधीतील कामे पूर्ण झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव 20 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. ब्लॉकनंतर पहिल्या दिवशी 20 किमी आणि त्यानंतर हळूहळू ४५ किमी अशी वेगमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे. येत्या शनिवारपर्यंत वेगमर्यादा काढण्यात येईल. सध्या विरारकडे जाणाऱ्या धीम्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. यानंतर दर आठवड्याला एका मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर संबंधित मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. सर्व वेगमर्यादा एका आठवड्यासाठी असणार आहेत.
ब्लॉक कालावधीत विरारकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील काम यशस्वीपणे पूर्ण झाले असून, स्थानकात नवे फलाटही उभारण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त आणि एसएजी दर्जाच्या अधिकारी समितीच्या संयुक्त मंजुरीनंतर नव्या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आगामी शनिवार-रविवारी 10 तासांचे एकूण चार ब्लॉक घेण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री 10 ते रविवारी सकाळी 8 पर्यंत ब्लॉकवेळेतील कामे सुरू राहणार आहेत. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेगमर्यादा अशी…तारीख : 7-8 सप्टेंबर मार्ग : चर्चगेट जाणारा धीमा वेगमर्यादा समाप्त : 14 सप्टेंबरतारीख : 21-22 सप्टेंबर मार्ग : विरारला जाणारा जलद वेगमर्यादा समाप्त : 28 सप्टेंबरतारीख : 28-29 सप्टेंबर मार्ग : चर्चगेटकडे जाणारा जलद वेगमर्यादा समाप्त : 5 ऑक्टोबरतारीख : 5-6 ऑक्टोबर मार्ग : पाचवा वेगमर्यादा समाप्त : 12 ऑक्टोबरहेही वाचाजीवघेणा लोकल प्रवास! 15 वर्षांत 52,348 प्रवाशांचा मृत्यू
पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक

Go to Source